Malpe Pernem Road Dainik Gomantak
गोवा

Malpe Pernem: 15 दिवसांत 4 दुर्घटना! खड्डेमय रस्ता; धोकादायक मालपे-पेडणे मार्गाला दुरुस्तीची प्रतिक्षा

Malpe Pernem Highway: पेडणे तालुक्यातील मालपे-न्हयबागपर्यंतचा पूर्वीचा राष्ट्रीय महामार्ग १७ हा अत्यंत धोकादायक स्थितीत असून खड्डेमय बनला आहे. हे खड्डे वाचताना अनेक वाहनांचा तोल जाऊन ती वाहने रस्त्याबाजूला कलंडतात.

गोमन्तक डिजिटल टीम

Malpe Nhaibag Highway At Pernem Bad Road Condition

मोरजी: पेडणे तालुक्यातील मालपे-न्हयबागपर्यंतचा पूर्वीचा राष्ट्रीय महामार्ग १७ हा अत्यंत धोकादायक स्थितीत असून खड्डेमय बनला आहे. हे खड्डे वाचताना अनेक वाहनांचा तोल जाऊन ती वाहने रस्त्याबाजूला कलंडतात. सरकार आणि सार्वजनिक बांधकाम खाते याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असताना लोकांचे बळी जाण्याची ते वाट पाहत आहेत का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

मालपे राष्ट्रीय महामार्ग ते न्हयबागपर्यंत बायपास रस्ता तयार करण्याचे काम एमव्हीआर कंपनीने केले होते. अधिकारी सरकार आणि संबंधितांनी दुर्लक्ष केल्यामुळे मनमानी पद्धतीने या रस्त्याचे काम सुरू झाले. बायपास रस्ता सुरू झाल्यावर जून महिन्यात पूर्ण रस्त्यावर दरड कोसळून हा रस्ता जून महिन्यापासून तो आतापर्यंत बंद आहे.

हा रस्ता बंद असल्यामुळे जो पूर्वीचा राष्ट्रीय महामार्ग १७ होता. त्या रस्त्यावरून सर्व प्रकारची वाहने हाकावी लागतात. तो रस्ता अत्यंत धोकादायक चढणीचा आणि खड्डेमय बनला आहे. हा रस्ता अरुंद असल्याने आणि खड्ड्यांमुळे दुसऱ्या वाहनांना बाजू देताना वाहनांना कसरत करावी लागते. त्या कसरतीमध्ये खड्ड्यांत वाहने गेल्याने एका बाजूला कलंडतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसानी होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत.

१५ दिवसांत ४ घटना

मागच्या पंधरा दिवसांपूर्वी या ठिकाणी ट्रक कलंडण्याची घटना घडली होती. त्यानंतर मागच्या तीन दिवसांत लॉरी कलंडली, त्यानंतर एक ट्रक कलंडला आणि आज शुक्रवारी दुचाकी घेऊन जाणारा एक मोठा कंटेनर ताबा सुटल्याने उतरणीवरून जाऊन समोरील रस्त्याच्या कडेला धडकला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi: "चोरी चोरी, चुपके चुपके..." राहुल गांधींनी केला 'वोट चोरीचा' व्हिडिओ; निवडणूक आयोगावर साधला निशाणा

Crime News: देवगड- फणसे समुद्रकिनाऱ्यावर आढळला शीर नसलेला मृतदेह, घात की अपघात?

काश्मीरनंतर 'द बंगाल फाइल्स'वरुन वाद; ट्रेलर लाँचवेळी कोलकातामध्ये गोंधळ, अग्निहोत्री म्हणाले, 'हुकूमशाही चालणार नाही'

Rain Dogs Exhibition: गोव्यात रविवारी 'रेन डॉग्स' प्रदर्शनाचं आयोजन, छायाचित्रांतून पाहता येणार 'भटक्या कुत्र्यांचे' वास्तव

Horoscope: कृष्ण जन्माष्टमीला गजकेसरी योग! 'या' 3 राशींना नशिबाची साथ; मिळेल आर्थिक लाभ

SCROLL FOR NEXT