Malpe Landslide  Dainik Gomantak
गोवा

Malpe Landslide: कंत्राटदारावर कारवाई नाही, चार महिने ढिगारे तसेच; रस्ता खुला कधी होणार?

NH 66 Landslide: मर्जीतल्या कंत्राटदाराची चूक असल्याने सरकारने त्यांच्यावर कारवाई करणे टाळले आहे अशा प्रतिक्रिया उमटत आहेत

गोमन्तक डिजिटल टीम

मोरजी: एमव्हीआर कंपनी कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे मालपे राष्ट्रीय महामार्ग ६६ बगलमार्गावरील दरड जून महिन्यात कोसळली, त्यानंतर हा रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आला. परंतु आजपर्यंत यावर कोणतीच उपाययोजना आखली गेली नाही. सरकारच्या मर्जीतल्या कंत्राटदाराची चूक असल्याने सरकारने त्यांच्यावर कारवाई करणे टाळले आहे,अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नुकतेच रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांना अभियंते कंत्राटदार यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे जाहीर केले आहे.

मग एमव्हीआर कंपनीने तयार केलेला पत्रादेवी ते धारगळपर्यंत राष्ट्रीय महामार्ग ६६ वर ठिकठिकाणी धोकादायक दरड कोसळून सार्वजनिक हानी होत असताना त्यांच्यावर सरकार कधी कारवाई करणार, असा सवाल काही नागरिक उपस्थित करत आहेत.

मालपे बायपास राष्ट्रीय महामार्ग तयार करत असताना कंपनीने रस्त्याच्या बाजूला भले मोठे डोंगर होते.ते डोंगर श्लोप पद्धतीने न कापता सरळ रेषेत कापले गेले. त्याचे परिणाम गेल्यावर्षीही दिसून आले.परंतु कंत्राटदाराला कसलीच हानी झाली नाही. मात्र जनतेच्या पैशांची वाट लागत आहे. याची उदाहरणे ठिकठिकाणी पहावयास मिळतात.

सरकारच्या मर्जीतला एमव्हीआर कंपनीचा कंत्राटदार असल्यामुळे सरकार त्यांच्यावर कारवाई करत नसेल, असा लोकांचा अंदाज आहे. परंतु सार्वजनिक हित सरकारने लक्षात घेऊन कंत्राटदारावर लवकरात बंद केलेल्या रस्त्यावर उपाययोजना करून हा रस्ता सर्व वाहतुकीसाठी खुला करावा.

मालपेत दरड कोसळून चार महिने उलटले. चतुर्थी सारख्या सणासुदीला जुना रस्ता पर्यायी मार्ग म्हणून चालू केला. तोही रस्ता खराब असल्याने,अवजड वाहनांमुळे मोठया प्रमाण भर पावसात ऐन चतुर्थीत अडथळे येऊन लोकांना त्रास सहन करावा लागतो. आमदार प्रवीण आर्लेकर यांनी पुढाकार घेऊन निदान आपल्या मतदारसंघातील त्रुटी लक्षात घेऊन जनतेला आपले कर्तृत्व दाखवायला हवे होते.
उदय महाले, पेडणे
मालपे पेडणे येथील महामार्गावर जी दरड कोसळली आहे, ती पाहता एमव्हीआर कंपनी ते काम करण्यास लायक नाही. किंवा तिथे खूप भ्रष्टाचार झालाय हे सिद्ध होते. आणि आपले सरकार तर फुशारक्या मारण्यात धन्यता मानत आहे. एकदा काम झालं कामाचे पैसे कंत्राटदाराला दिले की, मग तिथे कुणीही ढुंकून पाहत नाही. जनताही आपल्याच प्रपंचात अडकून पडलेली असते. याचाच फायदा सरकार व राजकारणी घेतात.
भारत बागकर, धारगळ

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'पोगो'वरुन गदारोळ, युरी आलेमावांनी गॅझेट फाडून हवेत भिरकावले, खुर्च्या उचलण्याचा प्रयत्न; MLA वीरेश बोरकरांना काढले सभागृहातून बाहेर

eSakal No 1: ई-सकाळचा करिष्मा कायम! 21.2 दशलक्ष वाचकांसह पुन्हा 'नंबर वन'

Video: चोरट्याची फजिती! स्कूटी घसरली, हेल्मेट पडलं अन् स्वतःही पडला; सोशल मीडियावरील 'हा' व्हिडिओ एकदा बघाच

IND vs ENG 4th Test: ओल्ड ट्रॅफर्डवर जो रुटचा दबदबा, द्रविड-कॅलिसला मागे टाकून रचला इतिहास; नावावर केला 'हा' मोठा रेकॉर्ड

Goa Assembly: पोगो ठरावावरुन विधानसभेत राडा, सभापती संतापले, वीरेश बोरकरांना सभागृहातून काढले बाहेर; वाचा दिवसभरातील घडामोडी

SCROLL FOR NEXT