Landslide In Goa: दरड कोसळल्याने कब्रस्तान, स्मशानभूमीला धोका; मुरगाव बोगदा येथे संरक्षक भिंतीची मागणी

Mormugao Landslide: संबंधित विभाग टेकडीवरील कोसळलेली दरड पाहून जबाबदारी घेण्यापासून माघार घेत आहेत
Mormugao Landslide: संबंधित विभाग टेकडीवरील कोसळलेली दरड पाहून जबाबदारी घेण्यापासून माघार घेत आहेत
Mormugao LandslideDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: मुरगाव-बोगदा-बामणावाडी-तारीवाडा येथील टेकडीखालील दरड कोसळल्याने सध्या वरील भागावर असलेल्या मुस्लीम समाजाचे कब्रस्तान व बिलिव्हर समाजाच्या स्मशानभूमीला धोका निर्माण झाला आहे.

टेकडीखालील दरड कोसळलेल्या ठिकाणी संरक्षक भिंत उभारणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र, संबंधित विभाग टेकडीवरील कोसळलेली दरड पाहून जबाबदारी घेण्यापासून माघार घेत आहेत. स्थानिक आमदार संकल्प आमोणकर यांनी मुरगाव तालुका आपत्कालीन व्यवस्थापन समितीचे प्रमुख तथा तालुक्याचे उपजिल्हाधिकारी भगवंत करमली यांना त्वरित कोसळलेल्या भागाचा अहवाल तयार करून राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाला पाठवावा, असे निर्देश दिले.

येत्या काही दिवसांत कोसळलेली दरड काढण्यास सुरवात करणार आहे. लवकर संरक्षक भिंत उभारण्याचे काम हाती घेण्यात येईल, असे आश्वासन आमोणकर यांनी दिले.

दरड कोसळलेल्या ठिकाणी मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांच्या अध्यक्षतेखाली मुरगावचे उपजिल्हाधिकारी भगवंत करमली, मुरगावचे मामलेदार प्रवीणजय पंडित, कॉप फुर्तादो, दत्तप्रसाद कामत, सागर शेट, ऋषिकेश देसाई, दीपक बांदेकर, मुरगावचे पोलिस निरीक्षक धीरज देविदास, वाहतूक पोलिस निरीक्षक शैलेश नार्वेकर व पदाधिकारी उपस्थित होते.

दोन दिवसांत अहवाल पाठवू!

आमदार आमोणकर यांनी टेकडीवरील धोका निर्माण झालेल्या कब्रस्तान व स्मशानभूमीची सर्व अधिकाऱ्यांना घेऊन पाहणी केली. तसेच उपजिल्हाधिकारी भगवंत करमली यांना कोसळलेल्या भागाचा अहवाल तयार करून संबंधित विभागाकडे पाठवावा, असे निर्देश दिले. यावर उपजिल्हाधिकारी करमली यांनी सांगितले की, येत्या दोन दिवसांत सर्व अहवाल तयार करून दक्षिण गोवा जिल्हाधिकारी व संबंधित विभागात पाठवणार आहे. नंतर दरड काढण्याचे काम सावधगिरीने हातात घेतले जाईल.

Mormugao Landslide: संबंधित विभाग टेकडीवरील कोसळलेली दरड पाहून जबाबदारी घेण्यापासून माघार घेत आहेत
Landslide In Goa: मुरगावात महामार्गाच्‍या बाजूस दरड कोसळली! आमदार आमोणकरांकडून पाहणी

सावधगिरीने काम करावे!

राष्ट्रीय महामार्ग बनविणारी कंपनी गॅमन इंडियानेही टेकडीखालील माती काढण्यास पुढाकार घेण्याचे टाळले. माती काढल्यास वरील भाग आणखीन कोसळण्याची शक्यता आहे. यासाठी राज्य सरकारने सावधगिरीने टेकडीखालील कोसळलेली दरड काढण्याची जबाबदारी स्वीकारावी, असे सुचविले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com