Illegal Fishing Trawlers Dainik Gomantak
गोवा

Illegal Fishing: गोव्‍याच्‍या हद्दीत घुसून कर्नाटकची बेकायदा मासेमारी! स्थानिक मच्छिमारांची कारवाईची मागणी

Karnataka Illegal Fishing: ज्‍या पद्धतीने मलपेचे ट्रॉलर मासेमारी करू लागले आहेत, ते पाहता गोव्‍यातील मच्‍छीमारांच्‍या जाळ्‍यात मासळी सापडणे कठीण होऊन बसणार असल्‍याची माहिती

गोमन्तक डिजिटल टीम

Illegal Fishing In Goa

मडगाव: मलपे - कर्नाटक येथील सुमारे ३०० ट्रॉलर गेल्‍या दोन तीन दिवसांपासून गोव्‍याच्‍या सागरी हद्दीत घुसून बेकायदा मासेमारी करीत असून त्‍यांच्‍यावर त्‍वरित कारवाई करावी, अशी मागणी बेतुल येथील मच्‍छीमार लवू केरकर व राजेंद्र केरकर यांनी केली आहे. ही मासेमारी बेसुमार असून त्‍यामुळे स्‍थानिकांना मासे मिळणे कठीण झाल्‍याचा दावा त्‍यांनी केला.

मलपे येथील ट्राॅलरना खुद्द मलपे तसेच मंगळूर, होन्नावर, कारवार इत्‍यादी किनारपट्टी भागात मासेमारी करण्‍यास बंदी घातली आहे. जर त्‍यांनी बंदी असताना मासेमारी केली, तर त्‍यांच्‍यावर त्‍या ठिकाणी कठोर कारवाई केली जाते. त्‍यामुळे हे ट्रॉलर गोव्‍याच्‍या हद्दीत घुसून समुद्र किनाऱ्याजवळ येऊन दोन दिवसांपासून मासेमारी करू लागल्‍याची माहिती राजेंद्र केरकर व लवू केरकर यांनी दिली आहे. यासंबंधी गाेव्‍यातील मच्‍छीमार खात्‍याकडे तक्रार केली तरी या तक्रारीची दखल घेतली जात नाही, असा आरोप त्‍यांनी केला.

सध्‍या हे ट्रॉलर आगोंद, पाळोळे व बेतुल परिसरात मासेमारी करीत आहेत. ते मुरगाव व तेथून पुढे केरी व मालपेपर्यंत मासेमारी करणार असल्‍याने त्‍यांच्‍यावर गोवा सरकारच्‍या मच्‍छीमारी खात्‍याने त्‍वरित कारवाई करावी, अशी मागणी करण्‍यात आलेली आहे.

मलपेच्‍या ट्रॉलरनी गोव्‍याच्‍या हद्दीत घुसून मोठ्या प्रमाणात तारले पकडल्‍याची माहिती केरकर यांनी दिली. गेल्‍या दोन दिवसांपासून तारले मासळीचे गोव्‍याच्‍या समुद्रात आगमन झालेले आहे. मात्र, ज्‍या पद्धतीने मलपेचे ट्रॉलर मासेमारी करू लागले आहेत, ते पाहता गोव्‍यातील मच्‍छीमारांच्‍या जाळ्‍यात मासळी सापडणे कठीण होऊन बसणार असल्‍याची माहिती लवू केरकर व राजेंद्र केरकर यांनी दिली.

...तर कारवाई का नाही?

जर गोव्‍याचे मच्‍छीमार महाराष्‍ट्रात किंवा कर्नाटकच्‍या हद्दीत गेले, तर त्‍यांच्‍यावर लगेच कारवाई होते. मग गोव्‍याच्‍या हद्दीत घुसणाऱ्या ट्रॉलरवर मच्‍छीमार खाते का कारवाई करू शकत नाही असा सवालही केरकर यांनी उपस्‍थित केला आहे. राज्‍य सरकारच्‍या मच्‍छीमार खात्‍याने खोल समुद्रात गस्‍त घालण्‍याची गरज आहे. परंतु त्‍याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. यापूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करून गस्‍त घालण्‍यासाठी बोट खरेदी केली हाेती. त्‍या बोटीचे काय झाले असा सवालही उपस्‍थित करण्‍यात आलेला आहे.

गोव्‍याचे मच्‍छीमार खाते सुस्‍त

मलपेचे ट्रॉलर गोव्‍याच्‍या हद्दीत घुसून बेकायदा मासेमारी करीत असल्‍याची कल्‍पना मच्‍छीमारमंत्री नीळकंठ हळर्णकर यांना दिली असता, त्‍यांनी स्‍थानिक मच्‍छीमारांनीच त्‍यांना हाकलून लावावे अशी सूचना केली. सध्‍या राज्‍य सरकारच्‍या मच्‍छीमार खात्‍याकडे कारवाई करण्‍यासाठी यंत्रणाच नसल्‍याचे त्‍यातून स्‍पष्‍ट झाले आहे. किमान सागरी पोलिसांना कळवून या ट्रॉलर्सवाल्‍यांना रोखण्‍यासाठी काही करण्‍याचे सौजन्‍यही खात्‍याकडे नाही, याबद्दल संताप व्‍यक्‍त करण्‍यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa AAP: दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आता गोवा आपच्या प्रभारी; नियुक्ती होताच भाजपवर केला हल्लाबोल

Governor of Goa: पी. अशोक गजपती राजू यांचा शपथविधी संपन्न; गोव्याचे नवे राज्यपाल म्हणून सूत्र हाती

Damodar Saptah 2025: जय जय रामकृष्ण हरी! श्री दामोदर भजनी सप्ताहाचे 126 वे वर्ष; रंगणार खास मैफील

Goa Live News: "POGO विधेयक एक दिवस विधानसभेत मंजूर होईल" मनोज

Google New AI Feature: गुगलचं नवं 'एआय' फीचर लाँच; माहिती शोधणं होणार अधिक अचूक

SCROLL FOR NEXT