Mallikarjuna Temple Canacona, Goa Dainik Gomantak
गोवा

Mallikarjun Temple Goa: श्री मल्लिकार्जुन देवस्थानात आज अवतार व कौलप्रसाद

Goa: गोवा व कर्नाटकातील महाजन, भाविक व अन्य या ठिकाणी उपस्थित राहून कौलप्रसादाचा लाभ घेतात.

दैनिक गोमन्तक

Mallikarjun Temple Goa: श्रीस्थळ, काणकोण येथील श्री मल्लिकार्जुन देवस्थानच्या अवतारपुरुषाचा वार्षिक कौलोत्सव शनिवारी (ता.7) श्रीस्थळ येथे होणार आहे. गोवा व कर्नाटकातील महाजन, भाविक व अन्य या ठिकाणी उपस्थित राहून कौलप्रसादाचा लाभ घेतात.

श्री अवतारपुरुष देवाचा प्रसिद्ध कार्यक्रम शनिवारपासून सुरू होत आहे. देवाची तरंगे, भगत, गडे व संबंधीत सेवेकरी मंडळी आदल्या दिवशी रात्रौ आसाळी, खालवडे व मैथळ (भाटपाल) या तिन्ही घरवईवर (मठ) जमतील व प्रत्येक मेळास परंपरेनुसार शुद्धी, अलंकार, पूजाअर्चा करुन उपाहार अर्पण केला जाईल.

पहाटे प्रत्येक मेळाचा आपापल्या घरवईवर अवतार कौलप्रसाद होऊन श्रीस्थळ येथे प्रयाण करेल. सकाळी 11.30 च्या दरम्यान श्रीस्थळ येथे श्री मल्लाकार्जुन देवालयाच्या प्राकारात तिन्ही मेळ एकत्रित येऊन खळ्ळेवरील अवतार होईल व सर्व मानेली, महाजन व भाविकांना कौल प्रसाद दिला जाईल.

सर्वांनी शांतता पाळावी व शिस्तीत कौल घ्यावा, संध्याकाळी सहापर्यंत सर्व भाविकांनी मंदिरात उपस्थित राहून कौल व कृपाशिर्वााद घ्यावेत.

वर्षपद्धतीप्रमाणे काही दिवसांनी म्हाल वेळीप, म्हाल देसाई, खालवडेची घरवय, मैथळची घरवय येथे ‘तळया’ (देवाला अर्पण केलेले नारळ, तांदूळ इ.) स्वीकारुन श्री देव अवतारपुरुषाचा लवाजमा शिवेश्‍वर महालात (उत्तर कर्नाटक) आपले कुळावी व भक्तांना दर्शन देण्यासाठी पायी प्रयाण करतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

America New Visa Policy: ऑनलाईन फ्रॉड अन् सेक्सटॉर्शन करणाऱ्यांना झटका! अमेरिकन नागरिकांना लुटणाऱ्या चिनी गँगवर निशाण्यावर; ट्रम्प सरकारची नवी व्हिसा पॉलिसी जाहीर

Weather Update: राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम! IMD कडून 31 जुलैपर्यंत 'यलो अलर्ट'; मुसळधार सरींचा अंदाज

CJP Protest Violence: 'सीजेपी' आंदोलनातील हिंसेमागे पाकिस्तान कनेक्शन! दंगल घडवण्यासाठी भामट्यांनी वापरले 'ब्लूटूथ ॲप्स'; पोलिस तपासात हायटेक नेटवर्क उघड

Who is Samreen Kaur: टीम इंडियाचा मॅचविनर 'समरीन'च्या प्रेमात क्लिन बोल्ड! गर्लफ्रेंडसोबतचा रोमँटिक फोटो शेअर; पाहा कोण आहे ती?

CJP Protest: "शांततापूर्ण आंदोलन हा घटनात्मक अधिकार!" विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज पोलिसांना नडला; दडपशाही रोखण्यासाठी सुप्रीम कोर्टाचा मास्टरप्लॅन

SCROLL FOR NEXT