male body found morod mapusa Dainik Gomantak
गोवा

Morod: शेतात आढळला कान तुटलेला मृतदेह! मारोड परिसरात खळबळ; चेहऱ्यावर मारहाणीच्या खुणांमुळे वाढला संशय

Male body Found morod mapusa: म्हापसा येथील मारोड परिसरात शनिवारी सकाळी एका पुरुषाचा जखमी अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

Sameer Panditrao

म्हापसा येथील मारोड परिसरात शनिवारी सकाळी एका पुरुषाचा जखमी अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास मुख्य रस्त्यापासून काही अंतरावर असलेल्या शेतात हा मृतदेह स्थानिकांच्या निदर्शनास आला.

मिळालेल्या माहितीनुसार, मृतदेहावर गंभीर जखमांचे चिन्ह दिसून आले. विशेषतः चेहऱ्यावर मारहाणीच्या खुणा असून एका कानाचा भाग वेगळा झालेला असल्याचे प्राथमिक पाहणीत समोर आले आहे. या घटनेची माहिती मिळताच म्हापसा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

पोलीस निरीक्षक नवीन देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने घटनास्थळी पंचनामा करून आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण केली. मृताची ओळख अद्याप पटलेली नसून, तो नेमका कोण आहे याचा तपास पोलीस करत आहेत.

दरम्यान, मृतदेह अधिक तपासासाठ गोवा मेडिकल कॉलेज येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. मृत्यूचे नेमके कारण पोस्टमॉर्टेम अहवालानंतरच स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, हा मृत्यू अपघाती आहे की घातपात याचा तपास सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, स्थानिकांची चौकशी आणि इतर पुराव्यांच्या आधारे पुढील तपास वेगाने सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Airstrikes Yemen Houthis: शेवटच्या मिनिटाला ऑर्डर बदलली! ट्रम्प यांनी अचानक का रोखला हूती बंडखोरांवरील लष्करी हल्ला? मध्य पूर्वेत महायुद्धाची ठिणगी पडता पडता वाचली

US Bank Layoffs: 5 मिनिटांचा गुगल मीट कॉल अन् 80 भारतीय कर्मचाऱ्यांना डच्चू! वर्क फ्रॉम होम सांगून अमेरिकन बँकेनी केली हकालपट्टी; कॉर्पोरेट जगतात खळबळ

Indian Foreign Policy: शेजारी देशांना एकाच पारड्यात तोलणे भारतासाठी धोक्याचे? पाकिस्तान-बांगलादेश संबंधांच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत राजकारणासमोरील मोठा सवाल

Asian Games 2026: भारतीय महिला हॉकी संघाचा वादळी विजय! इंडोनेशियाला 17-1 ने चिरडत पुढील फेरीत धडक; 'गोल्ड'वर भारताचा निशाणा

Valpoi Stray Dogs Survey: वाळपईत भटके कुत्रे, पाळीव कुत्रे अन् मोकाट जनावरांचे सर्वेक्षण; 25 सप्टेंबरपर्यंत माहिती देण्याचे पालिकेचे आवाहन

SCROLL FOR NEXT