सासष्टी : सिने विशांतच्या मागे, मालभाट-मडगाव येथे रस्त्यावरच उभारण्यात आलेल्या क्लब हाऊसचा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे. या बांधकामामुळे परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याचा दावा करून काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. हा कशाचा विकास? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
क्लब हाऊससारख्या या शेडमध्ये सोफा सेट, प्रोजेक्टर, बिअरचे कॅन असल्याची माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे, वीज खात्याचा ट्रान्सफॉर्मरही या शेडच्या आत बसवण्यात आला असून, त्यातून या क्लब हाऊसला बेकायदेशीर वीजपुरवठा होत असल्याचा आरोप आहे.
काँग्रेसच्या सरचिटणीस मनीषा उसगावकर म्हणाल्या की, हे बांधकाम नेमके कशासाठी हेच समजत नाही. स्थानिकांकडून रात्रीच्या वेळी येथे बेकायदेशीर कृत्ये सुरू असल्याच्या अनेक तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. त्यामुळे आम्ही प्रत्यक्ष येथे येऊन पाहणी केली. काही महिन्यांपूर्वी मडगावमध्येच सार्वजनिक गणेशोत्सव मंडपाच्या नावाखाली झालेला घोटाळा उघडकीस आला होता. हीसुद्धा त्याच मालिकेतील घटना नाही ना? असा सवाल त्यांनी केला.
मडगाव काँग्रेस ब्लॉकचे निमंत्रक सावियो कुतिन्हो म्हणाले, यासंदर्भात आम्ही मडगाव नगरपालिकेकडे चौकशी केली असता ‘ब्लॅक स्पॉट सौंदर्यीकरण’ या नावाखाली हे बांधकाम स्वतः नगरपालिकेने केले असल्याचे समोर आले. एका बाजूने उच्च न्यायालयाने रस्त्यावरील सर्व बेकायदेशीर बांधकामे हटविण्याचे आदेश दिले आहेत तर दुसऱ्या बाजूने नगरपालिका स्वतःच रस्त्यावर बांधकामे उभारत आहे. या रस्त्याची रुंदी किमान १० मीटर असावी असा आमचा अंदाज आहे. शेडसाठी दोन ते तीन लाख रुपये खर्च झाल्याचा अंदाज आहे.
काही लोकांची घरे रस्त्यावर असल्याचा दावा करून मडगावचे आमदार त्यांच्यावर दबाव आणतात. परंतु दुसरीकडे अशा प्रकारचे बेकायदेशीर कृत्यांना प्रोत्साहन देतात. या क्लब हाऊसची चौकशी होणे गरजेचे आहे.सबिता मास्कारेन्हस, काँग्रेस नेत्या
ट्रान्सफॉर्मर आत घेऊन बांधकाम करण्यात आले आहे. याबाबत आम्ही वीज खात्याकडे तक्रार करणार आहोत. या बांधकामाला वीज खात्याची कोणती मान्यता आहे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.सावियो कुतिन्हो, निमंत्रक, मडगाव काँग्रेस
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.