Makharotsav Navratri in Goa Dainik Gomantak
गोवा

Makharotsav Navratri in Goa: गोव्यातील मंदिरांमध्ये नवरात्रोत्सवात साजरा होणारा 'मखरोत्सव', भक्ती आणि परंपरेचा भव्य संगम

Navaratri 2025: नवरात्रोत्सव हा प्रमुखपणे देवीचाच उत्सव असला तरी गोव्यात मात्र, हा उत्सव पुरुष देवतांच्या मंदिरातही साजरा केला जातो.

Sameer Amunekar

नवरात्रोत्सव हा प्रमुखपणे देवीचाच उत्सव असला तरी गोव्यात मात्र, हा उत्सव पुरुष देवतांच्या मंदिरातही साजरा केला जातो. गोव्यात नवदुर्गा बोरी आणि मडकई, शिरोड्याची कामाक्षी, म्हार्दोळची महालसा, बांदोड्याची महालक्ष्मी, रामनाथीचा रामनाथ, मंगेशीचा मंगेश आणि नागेशीचा नागेश यासह माशेलातील मंदिरांत मखरोत्सव डोळ्यांचे पारणे फेडणारे असतात.

मखरोत्सव, आवळी अथवा वन भोजन, नौकारोहण ही गोव्यातील मंदिरांतील खास वैशिष्ट्ये आहेत. देवदेवतांना वनभोजनाला नेणे, नौकारोहणाच्या निमित्ताने मंदिराजवळच्या तळींत नौकेवर बसून जलविहार करणे (सांगड) आणि मखरोत्सवाच्या निमित्ताने मखरांत (झुल्यांत) बसवून आरतीच्या, घंटानादाच्या आणि ढोल ताश्यांच्या गजरांत झोके देणे, असे देवदेवतांच्या रंजनाचे क्रीडाप्रकार गोव्यातच आयोजिले जातात.

आश्विन शुध्द प्रतिपदेपासूनच गोव्यात शारदीय नवरात्रोत्सवाला आरंभ होतो. यंदा हा नवरात्रोत्सव २२ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. नवरात्रोत्सवात गोव्यातील प्रमुख मंदिरांत मखरोत्सवाचा सोहळा होतो. ही पूर्वापार परंपरा आहे.

नवरात्रोत्सव देवी दुर्गेशी निगडित आहे. आदिमायेचे सर्वप्रथम प्रकटलेले सगुण रूप म्हणजे देवी दुर्गा. मखरोत्सव हा शिव आणि शक्तीचा सोहळा. असा मखरोत्सव भारतात अन्य कुठल्याही मंदिरात होत नाही. पूर्वी महिषासुर नामक एका क्रूर राक्षसाने पृथ्वीवर खूप थैमान घातले होते. सज्जनांना अगदी सळो की पळो करून सोडलं होतं.

तेव्हा सर्वजण ब्रह्मा, विष्णू, महेश या देवतांकडे गेले. तेव्हा देवांना अत्याचारी महिषासूर राक्षसाचा फार राग आला. त्यांच्या क्रोधातून शक्तीदेवता प्रगटली. तिने महिषासुराशी नऊ दिवस युद्ध करून त्याला ठार मारले. म्हणूनच त्या देवीचे सर्वांनी नाव ठेवले महिषासुर मर्दिनी. या तिच्या शक्तिरूपाची पूजा नवरात्रोत्सवात केली जाते. गोव्यात जसा गणेश चतुर्थी हा सर्वांत मोठा सण, तसा पश्‍चिम बंगालमध्ये नवरात्रीत दुर्गा पूजा उत्सव साजरा होतो. गुजरातेत दांडिया व गरबा रास खेळला जातो. हे लोण गोव्यातही पोचले आहे.

नवरात्रोत्सव हा प्रमुखपणे देवीचाच उत्सव असला तरी गोव्यात मात्र, हा उत्सव पुरुष देवतांच्या मंदिरातही साजरा केला जातो. गोव्यात नवदुर्गा बोरी आणि मडकई, शिरोड्याची कामाक्षी, म्हार्दोळची महालसा, बांदोड्याची महालक्ष्मी, रामनाथीचा रामनाथ, मंगेशीचा मंगेश आणि नागेशीचा नागेश यासह माशेलातील मंदिरांत मखरोत्सव डोळ्यांचे पारणे फेडणारे असतात. प्रत्येक रात्री या मंदिरांत कीर्तने होतात. मी बोरी नवदुर्गा मंदिरात कित्येक सुप्रसिध्द कीर्तनकारांची कीर्तने ऐकली आहेत.

बोरीचे सुपुत्र प्रसिद्ध संवादिनी वादक पद्मश्री पं. तुळशीदास बोरकर हे नवरात्रांत खास मुंबईतून येऊन एक दिवस तरी पेटीवादन सेवा बजावत. गाणारी संवादिनी म्हणजे काय, हे आम्हाला इथेच कळले. बोरी आणि मडकईतील नवदुर्गा घंटानाद व वाद्यांच्या गजरांत देवी, विविध वाहनांवर आरूढ होते. देवतांचे विशिष्ट पध्दतीने झोके घेतानाची बोरीतील नवदुर्गेची या वाहनांवर आसनस्थ विहंगम दृश्ये, नयनरम्य असतात. मडकईतील नवदुर्गेचा मखरोत्सव पाहण्यास लोक गर्दी करतात. शेवटच्या दिवशी महिरूप आवर्जून पाहण्यासारखा. मंगेशीचा मंगेश म्हाताऱ्याचं रूप धारण करतो. मखरोत्सवाचा विलक्षण सोहळा हे एक निमित्त, भक्ती बळकट करण्याचे.

-सखाराम शेणवी बोरकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

Goa Mega Project: कारापूर-सर्वण मेगा प्रकल्पावर 2 दिवसांत निर्णय, शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; अधिकाऱ्यांना कागदपत्रे तपासण्याच्या सूचना

Indian Cricketers Ban: भारतीय क्रिकेटमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा फ्रॉड! अंडर-19 वर्ल्ड कप स्टार अडकला जाळ्यात; 65 खेळाडूंवर बंदी

Goa Accident: गोव्यात अपघातांची धडकी भरवणारी आकडेवारी! 19 महिन्यांत 1107 जणांचा मृत्यू; दिवसाला दोन जीवांचा बळी

Shukra Gochar 2026: वैभव अन् संपत्तीचा कारक बदलणार चाल! शुक्राचे नक्षत्र गोचर 5 राशींसाठी ठरणार वरदान; धनाचा होणार वर्षाव

SCROLL FOR NEXT