Ganesh Idol Dainik Gomantak
गोवा

गोव्‍यात आणल्‍या जाणार्‍या प्रत्‍येक गणेश मूर्तीची नोंद ठेवा; विजय सरदेसाईंचे मुख्य सचिवांना पत्र

PoP Ganesha idols: अशा मूर्ती गोव्‍यात येऊ नयेत यासाठी गोव्‍यात येणार्‍या प्रत्‍येक मूर्तीची तपासणी करुन त्‍याची नोंद करुन घ्‍यावी.

सुशांत कुंकळयेकर

पणजी: गणेश चतुर्थीसाठी गोव्‍याबाहेरुन मोठ्या प्रमाणावर प्‍लॅस्‍टर ऑफ़ पॅरिसच्‍या गणेशमूर्ती आणल्‍या जातात. त्‍यामुळे या मूर्ती विसर्जनानंतर गोव्‍यातील जलसाठ्यांचे प्रदुषण होते.

ही परिस्‍थिती लक्षात घेऊन अशा मूर्तीं राज्‍यात आणण्‍यावर निर्बंध आणावेत अशी मागणी गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई यांनी केलीय. गोव्‍यात आणल्‍या जाणार्‍या प्रत्‍येक मूर्तीची नोंद ठेवण्‍याची व्‍यवस्‍था सुरु करावी अशी मागणी त्यांनी मुख्‍य सचिवांना लिहिलेल्‍या पत्रात केली आहे.

यासंदर्भात सरदेसाई यांनी हल्‍लीच झालेल्‍या पावसाळी अधिवेशनात मुद्दा चर्चेत आणला होता. यावेळी मुख्‍यमंत्र्यांनी, अशा पर्यावरण हानीकारक मूर्ती राज्‍यात येऊ नये यासाठी राज्‍याच्‍या सीमांवर पथके तैनात करणार असे आश्वासन दिले होते.

याची आठवण करुन देताना सरदेसाई यांनी, अशा मूर्ती गोव्‍यात येऊ नयेत यासाठी गोव्‍यात येणार्‍या प्रत्‍येक मूर्तीची तपासणी करुन त्‍याची नोंद करुन घ्‍यावी.

या मूर्ती तयार करणारे उत्‍पादक, गोव्‍यात पुरवठा करणारे पुरवठादार तसेच त्‍यांची वाहतूक करणार्‍या वाहतूकदारांची माहिती नोंदवून घ्‍यावी. जेणेकरुन विसर्जनानंतर या मूर्त्या प्‍लॅस्‍टर ऑफ पॅरिसच्‍या असल्‍यास या सर्वांवर कारवाई करण्‍यात येईल असे त्‍यांनी म्‍हटले आहे.

वास्‍तविक सरकारने गोव्‍यात जे चिकन मातीच्‍या मूर्त्या करतात त्‍या कारागिरांना प्रोत्‍साहन देण्‍याची गरज असून अशा कारागिरांच्‍या मुर्तींना ग्राहक मिळावे यासाठी हस्‍तकला महामंडळाने पुढाकार घ्‍यावा.

अशा कारागिरांच्‍या मूर्तींसाठी युनिक बारकोड किंवा क्‍यूआर कोड देऊन या कारागिरांच्‍या मूर्त्यांना बाजारपेठ उपलब्‍ध होईल याकडे लक्ष द्यावे. गोव्‍यात आयात करुन आणल्‍या जाणार्‍या मुर्‍त्‍यांचे सरकारने काटेकोरपणे माहिती संकलन करावी अशी मागणी त्‍यांनी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today Live Updates: लोखंडी कमान मोडल्याने चोर्ला घाटात होतेय वाहतूक कोंडी!

Leopard In Goa: ..पुन्हा बिबट्याची दहशत! लामगाव परिसरात भीतीचे वातावरण

Cash For Job प्रकरणी एक ‘सोनार’ अडचणीत? सोन्याची बिस्कीटे ठेवली गहाण; पोलिसांनी घेतली जबानी

'Bicholim Cancer Screening'मध्ये आढळला स्वादुपिंडाचा रुग्ण! कर्करोगाचे तब्बल 129 संशयित; डिचोलीत 253 जणांची तपासणी

Amazing Goa: राज्यातील लघु उद्योगांना मिळणार चालना; ‘अमेझिंग गोवा’मध्ये ‘लघु उद्योग भारती’चे दालन

SCROLL FOR NEXT