Makar Sankranti 2023
Makar Sankranti 2023 Dainik Gomantak
गोवा

Makar Sankranti 2023 : मकर संक्रांतीमुळे डिचोली बाजार फुलांनी बहरला

दैनिक गोमन्तक

डिचोली : मकरसंक्रांतीमुळे सध्या डिचोलीचा बाजार फुलांनी फुलला असून, मागणी असल्याने सध्या फुलांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. हळदीकुंकवावेळी फुलांची आवश्यकता असल्याने मकरसंक्रांती ते रथसप्तमीपर्यंत फुलांचा रुबाब दिसून येणार आहे. फुलांना मागणी असल्याने सध्या फुलेही महागली आहेत.

सध्या फुलांच्या दरात 60 टक्क्यांनी वाढ झाली असून, फुलांचा तुटवडा निर्माण झाल्यास फुले आणखीही महागण्याची शक्यता आहे. हिंदू धार्मियांचे सण, उत्सव म्हटले, की फुलांना मागणी असते. सुवासिनींचा आनंद द्विगुणित करणारा नववर्षातील पहिला सण म्हणजे मकरसंक्रांती. मकरसंक्रांतीपासून घरोघरी ‘हळदीकुंकू’चे कार्यक्रम होतात. त्यामुळे या सणकाळात फुलांना प्रचंड मागणी असते.

मकरसंक्रांतीमुळे सध्या बाजारात विविध प्रकारच्या फुलांची आवक झाली असून, खरेदीलाही जोर आला आहे. डिचोलीत कर्नाटक आणि कोल्हापूर आणि महाराष्ट्र राज्यातून ठराविक फुलांची आवक होत असते. सध्या डिस्को शेवंतीसह लांब देठाची शेवती, लहान गुलाब आदी फुले बाजारात उपलब्ध झाली आहेत. फुलांना मागणी असली, तरी त्यातल्या त्यात ‘डिस्को शेवंती’चा रुबाब वाढला आहे. ‘अस्टर’ फुलांचा मात्र बाजारात तुटवडा आहे.

भाव वधारले

मागील महिन्याच्या तुलनेत फुलांच्या दरात किमान 60 टक्के वाढ झाली आहे. सध्या घाऊक विक्रेत्यांकडे डिस्को शेवंतीसह अन्य प्रकारची फूले प्रति किलो 400 रुपये दराने विकण्यात येत आहेत. फुले महाग झाल्याने फाती, वेणी, गजरे आणि हार यांचेही दर दुप्पट झाले आहेत. फुलांचे घाऊक दर वाढल्याने फाती, वेणी, हार यांचे दर वाढवावे लागले आहेत, असे बाजारातील फुलविक्रेती सीमा नाईक हिने सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : शिरोडा मतदारसंघातून धेंपेंना मताधिक्य देणार : मंत्री सुभाष शिरोडकर

Goa Congress: दक्षिणेत भांडवलदार उमेदवार, मित्रांच्या फायद्यासाठी गोव्यात जमिनीचे रूपांतर - पवन खेरा

Goa Today's Live News:सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत - अमित पाटकर

Panaji: पणजीच्या पोटात दडलंय तरी काय? खोदकामात सापडली आणखी एक रहस्यमय मूर्ती

Video: ‘’प्रज्वल रेवण्णाला....’’; कर्नाटक सरकारमधील मंत्र्याच्या वक्तव्याने नव्या वादाला फुटले तोंड

SCROLL FOR NEXT