supplying water pipeline burst  Dainik Gomantak
गोवा

Mapusa : जलवाहिनी फुटली; बार्देशात मर्यादित पाणी

चाळीस वर्षांची ही जुनी जलवाहिनी

दैनिक गोमन्तक डिजिटल

माडेल-थिवी येथे राष्ट्रीय महामार्गावर बार्देशला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटल्याचा प्रकार आज सकाळी 6 वाजता उघडकीस आला. यामुळे काल दिवसभर बार्देश तालुक्यात मर्यादित पाणी पुरवठा झाला असून आज गुरुवारीही अशीच स्थिती राहिल.

चाळीस वर्षांची ही जुनी जलवाहिनी आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणीपुरवठा विभागाकडून ही वाहिनी दुरुस्त करण्यात येत असल्याचे सहाय्यक अभियंता जुझे काल्देरो यांनी सांगितले.

या भागांवर परिणाम

वाहिनी फुटल्यामुळे पाणीपुरवठा बंद असल्याने गुरुवारीही बार्देश तालुक्याला मर्यादित पाणीपुरवठा राहील. तर गिरी, साळगाव आसगाव, हणजूण, वागातोरचा पाणीपुरठा पूर्णतः बंद करण्यात आला आहे. कळंगुट, पर्रा, थिवी, म्हापसा, बस्तोडा, उसकई आदी ठिकाणी पाणीपुरवठ्यावर अंशतः परिणाम राहील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अमेरिकेचा भारताला 'सॅल्युट'! तेल बाजारातील स्थिरतेसाठी मोदी सरकारची भूमिका ठरली निर्णायक; अमेरिकन राजदूतांकडून तोंडभरुन कौतुक

Hindu New Year: 19 मार्चपासून हिंदू नववर्षाची सुरुवात! गुरु अन् मंगळच्या आशीर्वादानं उजळणार 'या' 4 राशींचं नशीब; नोकरी अन् शिक्षणात प्रगतीचा योग

''स्वप्नात वाटलं जीजूंनी पकडलं, म्हणून...'', 7 वर्षे कोर्टाच्या फेऱ्या अन् 19 दिवस खाल्ली जेलची हवा; अखेर पॉक्सो कोर्टाकडून एअरफोर्स जवानाची सुटका

LPG Crisis: क्रिकेटप्रेमींची चिंता वाढवणारी बातमी! आयपीएल 2026 वर गॅस संकटाचं सावट; बीसीसीआय लवकरच घेणार मोठा निर्णय?

Volkswagen Layoffs: ऑटोमोबाईल विश्वात मोठा भूकंप! 'फोक्सवॅगन' 50000 कर्मचाऱ्यांना देणार नारळ; पोर्शे अन् ऑडी सारख्या ब्रँड्सनाही फटका

SCROLL FOR NEXT