Gelatin Explode In Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Gelatin Blast: मुलगी बेशुद्ध, एकाला ऐकू येईना! अन्सोळेतील स्फोटामुळे अनेक घरांचे नुकसान

Goa Gelatin Blast: भिरोंडा सरपंच, पंच व तलाठी यांनी परिसरातील घरांची पाहणी केली असता, १६ घरांचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Gelatin Blast

अन्सोळे-भिरोंडा येथे सोमवारी (८ रोजी) रात्री ८.३०च्या सुमारास मोठा स्फोट होऊन परिसर हादरला. याप्रकरणी वाळपई पोलिसांनी नासीर हुसेन जमादार (वय ५३ वर्षे, रा. नुहा कॉलनी, नागवे) याला अटक केली.

भिरोंडा सरपंच, पंच व तलाठी यांनी परिसरातील घरांची पाहणी केली असता, १६ घरांचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले. मात्र, एकूण किती नुकसान झाले, याची माहिती मिळू शकली नाही.

हा स्फोट एका खासगी मालमत्तेतील पंप हाऊसमध्ये झाला. तो इतका जबरदस्त होता की, त्याचा आवाज सुमारे ५ किलोमीटर अंतरापर्यंत गेला. तसेच एक किलोमीटरवरील घरांच्या भिंती, तावदाने, छप्परे, खिडक्या, दरवाजे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

या दुर्घटनेत जीवितहानी झाली नसली, तरी सत्तरी तालुक्याला हादरा बसल्याने परिसरातील लोक भयभीत झाले आहेत. नासीर याला आज न्यायालयात हजर केले असता, त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी बजावली आहे.

फॉरेन्सिक पथकाद्वारे तपास

आज (मंगळवारी) स्थानिक पंच, सरपंच व तलाठी यांनी परिसरातील नुकसान झालेल्या घरांची पाहणी केली. तसेच पोलिस उपअधीक्षक सागर एकोस्कर, वाळपईचे पोलिस निरीक्षक राहुल नाईक आदींनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मंगळवारी सकाळपासून फाॅरेन्सिक पथक घटनास्थळी तपास करीत होते.

गुलाब यासीन वास्ता, रफीक मोहम्मद शेख, रादोर भस्सीग्गोन, रेश्मा मुनीर शहा, स्मिता शैलेश पोकळे, सय्यद अग्लोस मोहिद्दीन, शकील खान, परवेज खान, इब्राहीम खान, शहनाज सलीम मोहम्मद, अब्दुल रझाक खान, अब्दुल सादिक बेग, नुरुनिस्सा वास्ता, निटू भागो पावणे, गंगो पावणे, प्राची ताटे, शेख कमलुद्दीन आदींच्या घरांचे मोठे नुकसान झाले असून घरातील सिलींग, खिडक्या, पत्रे, दरवाजे, तसेच भिंतींनाही तडे गेले आहेत.

दाभाळपर्यंत पोहोचला स्फोटाचा आवाज

अन्सोळेतील या स्फोटाचा प्रचंड आवाज कुळे, शिगाव व दाभाळ परिसरात आल्याने त्यावेळी येथील ग्रामस्थांमध्ये आपापसांत चर्चा सुरू होती. शिगाव येथील लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री ८.३० वा. प्रचंड आवाज झाला.

जमीनही हादरली. येथील डॉ. सचिन तेंडुलकर म्हणाले की, वाळपई ते शिगाव हे अंतर ४० कि.मी. आहे. दाभाळही ४० ते ५० कि.मी. अंतरावर आहे. तरीही एवढा मोठा आवाज आणि जमीन हादरणे म्हणजे हा मोठ्या बॉंबस्फोटासारखा प्रकार असावा.

नमाज पठणानंतर धमाका

येथील रादोर भस्सीग्गोन यांनी हल्लीच कर्ज काढून नवीन घर बांधले आहे. अद्याप गृहप्रवेश सोहळाही झालेला नाही. त्यांच्या घराला तडे गेले आहेत. रादोर म्हणाले की, मी नमाज पठण करून खुर्चीवर बसलो होतो. त्याचवेळी भयंकर स्फोट झाला. मी खुर्चीवरून खाली पडलो, तसेच माझी बहीण बेशुद्ध पडली. या परिसरातील एकाला स्फोटाच्या आवाजाने ऐकायलाही येत नव्हते.

जिलेटिन की, अन्य काही?

नासीर याने दिलेल्या माहितीनुसार, त्याने जिलेटिन आणून पंप हाऊसमध्ये ठेवले होते. त्याचा स्फोट झाल्याचे त्याने सांगितले. त्याने जिलेटिनच्या २५ कांड्या ठेवल्याची माहिती दिली. पण २५ जिलेटिन कांड्यांचा एवढा मोठा स्फोट होऊ शकतो का, याबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे हा जिलेटिनचा स्फोट नसून स्फोटके वगैरे असू शकतात, असा संशय व्यक्त केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa ZP Election: युती झाली, पण जागावाटप थांबले! झेडपी निवडणुकीत 'काँग्रेस-फॉरवर्ड-आरजीपी' एकत्र; आरक्षणाच्या निवाड्याकडे तिन्ही पक्षांचे लक्ष

South Goa ZP Reservation: ओबीसी 'ट्रिपल टेस्ट' आणि एससी आरक्षणाचा पेच! झेडपी निवडणुकीच्या भवितव्याचा निर्णय आता न्यायालयाच्या हाती

Mhadei Sanctuary Issue: सीमा ठरवणार, वस्ती हलवणार? म्हादई अभयारण्यात वस्तीला परवानगी नाही, व्याघ्र प्रकल्पाचा पर्याय हुकल्याने गोंधळ; क्लॉड आल्वारिस यांनी स्पष्टच सांगितलं

Goa Robbery Incident: सराफा दुकानाचे शटर फोडले, सीसीटीव्हीवर स्प्रे मारला, पण पोलिसांच्या 'सतर्कते'मुळे चोरट्यांचा चोरीचा डाव फसला; चावडी बाजारात मध्‍यरात्री थरार!

Horoscope: नवीन संधी येऊ शकते, महत्त्वाच्या निर्णयात संयम हवा! वाचा तुमच्या राशीचे भविष्य

SCROLL FOR NEXT