Goa Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident : आमोणा जंक्शनजवळ केमिकलच्या टँकरचा अपघात; चालक गंभीर जखमी

अपघातामध्ये कंटेनरचं मोठं नुकसान झालं असून यात केमिकलही जमिनीवर सांडल्याने परिसरात भीतीचं वातावरण आहे.

आदित्य जोशी

साखळी माशेल रस्त्यावर आमोणा जंक्शनजवळ एका केमिकलच्या कंटेनरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चालक आणि क्लिनर गंभीर जखमी झाले आहेत. आज बुधवारी सकाळीच हा अपघात झाला. अपघातामध्ये कंटेनरचं मोठं नुकसान झालं असून यात केमिकलही जमिनीवर सांडल्याने परिसरात भीतीचं वातावरण आहे.

दरम्यान ज्याठिकाणी हा अपघात झाला तिथे तीव्र वळण आहे. याच ठिकाणी बऱ्याचदा वळणाचा अंदाज न आल्याने अपघात झाले आहेत. कंटेनर चालकाचंही या अवघड वळणावर कंटेनरवरचं नियंत्रण सुटलं असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. हा अपघात इतका भीषण होता की यात कंटेनरच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला आहे. अपघातानंतर तातडीने 108 रुग्णवाहिकेला बोलावण्यात आलं. जखमी चालक आणि क्लिनरला गंभीर स्थितीत रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

आमोणे गावातील हा परिसर अपघातप्रवण क्षेत्र मानला जातो. याठिकाणी अनेकदा समोरुन येणारं वाहन न दिसल्यामुळे, तीव्र वळणाचा अंदाज न आल्यामुळे आणि भरधाव वेगामुळे अपघात होतात. या भागात गतीरोधकांचं प्रमाणही कमी असल्यामुळे वेदांता कंपनीकडून अनेकदा वाहनं भरधाव वेगाने खाली येतात आणि नियंत्रण सुटल्यामुळे खाली शेतात कोसळतात. हे अपघात रोखण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांमधून होताना दिसत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT