Power Shutdown 
गोवा

Power Shutdown: तांबोसे येथे वीज खांबावर झाड कोसळले, तीन गावांचा वीज पुरवठा खंडीत

तांबोसे येथे वीज खांबावर झाड कोसळल्याने तीन गावांचा वीज पुरवठा खंडीत झाला आहे.

Pramod Yadav

तांबोसे येथे वीज खांबावर झाड कोसळल्याने तीन गावांचा वीज पुरवठा खंडीत झाला आहे. गोवा वीज खात्याच्या वतीने याबाबत माहिती देण्यात आली आहे. खात्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून, दुरूस्तीचे काम सुरू आहे. वीज पुरवठा लवकरात लवकर सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे खात्याने म्हटले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार तांबोसे येथे शेतात असलेल्या वीज खांबावर झाड कोसळले आहे. यामुळे तांबोसे, मोपा आणि तोरसे गावातील वीज पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू असून कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. अशी माहिती वीज खात्याच्या वतीने देण्यात आली आहे.

दरम्यान, राज्यात मागील तीन ते चार दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे नैसर्गिक आपत्तींना काही प्रमाणात आळा बसला आहे. मात्र, झाड कोसळणे यासारख्या घटनांमुळे घरांचे नुकसान होण्यासह वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार घडत आहेत.

तसेच, पुढील चार दिवसांसाठी राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Madgaon Urban Bank: मडगाव अर्बनच्या ठेवीदारांना पुन्हा धक्का; पैसे मिळण्याची निश्चित तारीखच नाही! 4.20 कोटींच्या वसुलीसाठी 154 खटले

Goa POCSO Case: 10 वर्षांची सक्तमजुरी, दंड अन् आता सर्वोच्च न्यायालयात आव्हान, लैंगिक अत्याचार प्रकरणी पीडितेसह सरकारला नोटीस

Teacher Transfer Protest: 'आम्हाला हे शिक्षक यावर्षी तरी हवेत'; पेडणेतील विद्यार्थ्यांचा वर्गांवर बहिष्कार, जोरदार निदर्शने

Volkswagen Layoffs: मेड इन चायनाचा दणका! फॉक्सवॅगन 1 लाख कर्मचाऱ्यांना देणार नारळ; ऑटोमोबाईल जगतात इतिहासातील सर्वात मोठी कपात

Post Office Recruitment 2026: 10वी पास तरुणांसाठी खूशखबर! पोस्ट ऑफिसमध्ये 130 पदांवर भरती; अर्ज कुठे करावा? अर्जाची अंतिम तारीख काय? जाणून घ्या सर्व

SCROLL FOR NEXT