Goa Drug Case Dainik Gomantak
गोवा

Goa Drug Case: गोवा पोलिसांचा दणका! वागातोर येथे 2.20 लाखांच्या ड्रग्जसह मुंबईतील तरुणाला अटक

Anjuna Police Drug Bust: उत्तर गोव्यातील वागातोर परिसरात ड्रग्जविरोधी मोहीम राबवताना हणजूण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. शुक्रवारी टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी २.२० लाख रुपये किमतीचा एलएसडी पेपर ड्रग्ज जप्त केला.

Sameer Amunekar

पणजी: उत्तर गोव्यातील वागातोर परिसरात ड्रग्जविरोधी मोहीम राबवताना हणजूण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. चिवार वागातोर येथील फुटबॉल मैदानाजवळ शुक्रवारी (१८ एप्रिल) मध्यरात्रीच्या सुमारास टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी २.२० लाख रुपये किमतीचा एलएसडी पेपर ड्रग्ज जप्त केला असून, या प्रकरणात मुंबईतील आशिष पंजाबी (वय ३९) याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, चिवार वागातोर परिसरात एका युवकाकडून अमली पदार्थांची तस्करी होणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.

गोपनीय माहितीच्या आधारे उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक अक्षत कौशल आणि उपअधीक्षक आशिष शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हणजूण पोलिस निरीक्षक सुरज गावस यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक नवनीत गोलतेकर व त्यांच्या पथकाने शुक्रवार, १८ एप्रिल रोजी रात्री ३.२० वाजल्यापासून सकाळी ६.५० पर्यंत या परिसरात सापळा रचलत कारवाई केली.

या कारवाईदरम्यान पोलिसांना संशयास्पद हालचाल करणारा एक युवक दिसून आला. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून २२ एलएसडी ब्लॉट पेपर (एकूण वजन ०.५७ ग्रॅम) आढळून आले. या ड्रग्जची किंमत सुमारे २.२० लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आशिष पंजाबी (वय ३९, रा. मुंबई) असं आरोपीचं नावं असून, त्याच्या विरोधात अमली पदार्थ विरोधी कायद्याच्या कलम २० (सी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करून म्हापसा येथील न्यायालयात हजर करण्यात आलं असता त्याला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

गोवा हे देशविदेशातील पर्यटकांचे आकर्षणकेंद्र असल्यानं येथे मोठ्या प्रमाणात पर्यटकांची वर्दळ असते. याचाच गैरफायदा घेत काही गुन्हेगारी काही प्रवृत्तीचे लोक अमली पदार्थांच्या विक्रीसाठी गोव्यात दाखल होत असल्याचे वेळोवेळी उघडकीस आलं आहे. मात्र, गोवा पोलिस अशा अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी सातत्याने कारवाई करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa AAP: दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आता गोवा आपच्या प्रभारी; नियुक्ती होताच भाजपवर केला हल्लाबोल

Governor of Goa: पी. अशोक गजपती राजू यांचा शपथविधी संपन्न; गोव्याचे नवे राज्यपाल म्हणून सूत्र हाती

Damodar Saptah 2025: जय जय रामकृष्ण हरी! श्री दामोदर भजनी सप्ताहाचे 126 वे वर्ष; रंगणार खास मैफील

Goa Live News: "पी.अशोक गजपती राजू यांचे मी स्वागत करतो" डॉ. प्रमोद सावंत (मुख्यमंत्री)

Google New AI Feature: गुगलचं नवं 'एआय' फीचर लाँच; माहिती शोधणं होणार अधिक अचूक

SCROLL FOR NEXT