Major Accident On Banastarim Bridge  Dainik Gomantak
गोवा

Banastarim Bridge Accident : बाणास्तरी पुलावर पाच वाहनांचा विचित्र अपघात; तिघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

अपघातात दोन दुचाकींचा समावेश

Rajat Sawant

Major Accident Reported On Banastarim Bridge : बाणास्तरी पुलावर पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. वाहने एकमेकांवर आदळल्याने हा अपघात झाला. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे तर दोघा गंभीर जखमींना गोमेकॉत उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

अपघातात दोन दुचाकींचा समावेश असून वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

अधिक माहिती अशी की, बाणास्तरी पुलावरुन विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका आलीशान कारने तीन कार व दोन दुचाकींना धडक दिली. या भीषण धडकेत तिघांचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. म्हार्दोळ पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा सुरु आहे.

आलीशान कार एक युवती चालवत होती. कारमध्ये तिच्या सोबत एक युवक होता. तसेच कारमध्ये मद्याच्या बॉटल्स आढळून आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. जोपर्यंत कारमधील युवक व युवती घटनास्थळी येत नाहीत तोपर्यंत अपघातग्रस्त आलीशान कार घटनास्थळावरुन हलवू देणार नाही अशी मागणी येथील स्थानिकांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

आयपीएल 2027 पूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठ्या घडामोडी, रोहित शर्मा पुन्हा कर्णधार होणार?

SCROLL FOR NEXT