Srinivas Naik Firing Case Dainik Gomantak
गोवा

Srinivas Naik Firing Case: पर्वरी गोळीबार प्रकरण: थिवी येथे पिस्तूल, जीवंत काडतूस जप्त; संशयितांवरील फास आणखी घट्ट

Majestic Casino director Srinivas Naik firing: श्रीनिवास नायक यांच्यावरील गोळीबार प्रकरणात पसार झालेल्या हल्लेखोरांनी ज्या शस्त्राचा वापर केला, ते पिस्तूल आणि एक जीवंत काडतूस पोलिसां पर्वरी गोळीबार प्रकरण: थिवी येथे पिस्तूल, जीवंत काडतूस जप्त; संशयितांवरील फास आणखी घट्ट

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: ‘मॅजेस्टिक’ कॅसिनोचे संचालक श्रीनिवास नायक यांच्यावरील गोळीबार प्रकरणात पसार झालेल्या हल्लेखोरांनी ज्या शस्त्राचा वापर केला, ते पिस्तूल आणि एक जीवंत काडतूस पोलिसांनी थिवी रेल्वे स्टेशनजवळील हिंदू स्मशानभूमी परिसरातून जप्त केले. बुधवारी रात्री गोवा पोलिसांनी हे शस्त्र हस्तगत केले असून, गुन्ह्याच्या या मोठ्या पुराव्यामुळे संशयितांच्या गळ्याभोवतीचा फास अधिक घट्ट झाला आहे.

२८ ऑगस्ट रोजी रात्री पर्वरी येथील हॉटेल निओ मॅजेस्टिकबाहेर श्रीनिवास नायक यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी अचानक अंदाधुंद गोळीबार केला होता. नायक यांच्या सुरक्षारक्षकाने प्रसंगावधान राखून प्रत्युत्तरादाखल गोळीबार केल्याने नायक या भीषण हल्ल्यातून वाचले. गोळीबारानंतर परिसरात प्रचंड घबराट पसरली होती. या घटनेनंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, पळून जाताना पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आणि पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी या प्रकरणात वापरलेले पिस्तूल व जीवंत काडतूस संशयितांनी थिवी रेल्वे स्टेशनजवळील स्मशानभूमी परिसरात फेकून दिले होते. व्यावसायिक शत्रुत्वावरून हा सुपारी देऊन घडवून आणलेला हल्ला असल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत काझू शेख याच्यासह मुंबईतील व्यावसायिक सतीश शिंदे याच्यासह काही महत्त्वाच्या संशयितांना अटक केली आहे. सतीश शिंदे यानेच हल्लेखोरांची सोय केली होती का, यादृष्टीने गुन्हे शाखेचा तपास करत आहे.

काही दिवसांपूर्वी कथित शूटरचा एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये त्याने नायक यांच्यावरच आरोप करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, गुन्हे शाखेने हा तपास भरकटवण्यासाठी रचलेला कट असल्याचे स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Goa Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

Mahindra XUV 3XO CNG : महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

Ranji Trophy 2026: पिठिया-भार्गवच्या फिरकीपुढे गोव्याची शरणागती! बडोद्याचा डाव व 135 धावांनी दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT