Sumanta Fernandes Death Case Dainik Gomantak
गोवा

Sumanta Fernandes Case: अखेर आईच्या प्रयत्नांना यश! सासरच्या छळाला कंटाळून मुलीने जीव दिल्यानंतर सासूवर हुंडाबळीचा गुन्हा दाखल

सुमंताचा मृत्यू हुंड्यामुळे झाला असल्याचे समोर आले

Kavya Powar

Sumanta Fernandes Death Case: तीन महिन्‍यांपूर्वी नुवे येथे जळून मृत्‍यू आलेल्‍या सुमंता फर्नांडिस हिच्या मृत्‍यूप्रकरणाला वेगळे वळण प्राप्त झाले आहे. सुमंताचा मृत्यू हुंड्यामुळे झाला असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सुमंताची सासू पॅट्रोसीना फर्नांडिस यांच्याविरोधात हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सासरच्या छळाला कंटाळून सुमंताने स्वतःला जाळून घेतल्याने 30 ऑगस्ट रोजी तिचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आपल्‍या मुलीला तिच्‍या सासरच्‍याच लोकांनी जाळून मारले आहे, असा आरोप सुमंताची आई मारिया फर्नाडिस यांनी केला.

या प्रकरणात संबंधितांवर ४८ तासांच्‍या आत हुंड्यासाठी छळ आणि खुनाच्‍या आरोपाखाली गुन्‍हा नोंद करा, अशी मागणी करणारे एक निवेदन दक्षिण गोवा पोलीस अधीक्षकांना देण्यात आले होते.

दरम्‍यान, मंगळवारी (ता.28) सुमंताच्‍या आईसह प्रतिमा कुतिन्‍हो यांनी मायणा-कुडतरी पाेलिस स्‍थानकाला भेट देऊन निरीक्षक अरुण देसाई यांची भेट घेतली. याप्रकरणी सुमंताचा नवरा नोएल ब्रागांझा आणि त्‍याच्‍या आईवर गुन्‍हा नोंद करा, अशी मागणी त्‍यांनी केली.

जोपर्यंत गुन्‍हा नोंद केला जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्‍यात घेणार नाही, अशी भूमिका तिच्‍या आईने घेतल्‍याने मागचे तीन महिने सुमंता हिचा मृतदेह गोमेकॉच्‍या शवागारातच पडून आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT