Goa Daily News Updates: गुन्हे, अपघात, राजकीय घडामोडी; वाचा दिवसभरातील महत्वाच्या बातम्या

Goa Breaking News 01 December 2023: पणजी, म्हापसा, मडगाव तसेच राज्यातील ब्रेकिंग न्यूज
Goa Live Updates 01 December 2023
Goa Live Updates 01 December 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

सर्वपक्षीय नेत्यांकडून राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाची मंत्री बाबूश यांच्याकडून पाहणी

उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाची मंत्री बाबूश यांच्याकडून पाहणी करण्यात आली. कार्यालयाचे स्थलांतर करण्याची गरज असल्याचे यावेळी बाबूश म्हणाले.

लोलये- पोळे येथे पाळीव कुत्र्याची बिबट्याने केली शिकार

लोलये- पोळे येथे पाळीव कुत्र्याची बिबट्याने शिकार केल्याची घटना उघडकीस आली आहे. बिबट्याने कुत्र्याला फरफटत नेल्याचे स्थानिकांनी म्हटले आहे.

आकय-म्हापसा विलास केरकर खून प्रकरणी भावाला जन्मठेप

आकय-म्हापसा विलास केरकर खून प्रकरणी उत्तर गोवा जिल्हा सत्र न्यायालयाने भाऊ ज्ञानेश्वर वसंत केरकर याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यापूर्वी दुसरा भाऊ विनोद याने शिक्षा भोगल्याने त्याची सुटका झालीय.

गोव्यात गेल्या पाच वर्षात एड्समुळे 136 मृत्यू

गोव्यात गेल्या पाच वर्षात ए़ड्सची लागण झाल्याने 136 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

वेर्णा येथे अपघात, सायकल चालकाचा मृत्यू

वेर्णा येथे झालेल्या अपघातात सायकल चालकाचा मृत्यू झाला असून, एक 73 वर्षीय ज्येष्ठ नागरिक जखमी झाले आहेत. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

कामाक्षी उड्डापनोव खून प्रकरणी म्हापसा न्यायालयात 600 पानी चार्जशीट सादर

कामाक्षी उड्डापनोव खून प्रकरणी पर्वरी पोलिसांनी चार्जशीट दाखल केली आहे. निरुपदी कडाकक्ल आणि फकीर उर्फ प्रकाश चुंचवाड यांच्या विरुद्ध म्हापसा न्यायालयासमोर 600 पानी चार्जशीट सादर करण्यात आली आहे.

PM Modi म्हणतात... परदेश विसरा भारतातच करा लग्न; काश्मीर, गोवा, केरळ आहेत उत्तम पर्याय

केवळ श्रीमंतच नव्हे तर मध्यमवर्गीयही आता डेस्टिनेशन वेडिंगसाठी परदेशात जाऊ लागले आहेत. नुकतेच मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत चिंता व्यक्त करत भारतीय लोकांनी परदेशात न जाता देशातच लग्न केले तर देशाचा पैसा देशातच राहील आणि अर्थव्यवस्थाही मजबूत होईल, असे सांगितले.

परदेशात लग्न करणं हा एक वेगळाच अनुभव असेल असं काही लोकांना वाटतं. तर, काही लोकांसाठी तो स्टेटसचाही विषय असतो. पण, भारतात देखील खूप सुंदर ठिकाणे आहेत जिथे परदेशात जाऊन लग्न केल्यासारखाच अनुभव मिळू शकतो, असे तज्ज्ञ सांगतात.

भोजपूरी राणीचा गोव्यात जाळ अन् धूर संगट, पाहा व्हिडिओ आणि फोटो

 'बिग बॉस OTT 2' फेम मनीषा राणी सध्या गोव्यात आहे आणि तिच्या ग्लॅमरस लूकने चाहत्यांना आकर्षित करत आहे. मनीषा राणीचे फोटो काही वेळातच इंस्टाग्रामवर व्हायरल झाले आहेत. सोशल मीडियावर त्याच्या फोटो आणि व्हिडिओवर लोक लाईक्स आणि कमेन्टसा वर्षाव करत आहेत.

अलीकडेच मनीषा राणी अभिषेक मल्हान आणि एल्विश यादवसोबत एका गाण्यात दिसली होती.

भलतं धाडस जीवावर बेतलं! मडगाव येथे रेल्वेच्या ओव्हरहेड तारेच्या संपर्कात आलेल्या इसमाचा मृत्यू

मडगाव रेल्वेस्थानकावर रेल्वेच्या छतावर उभे राहून विद्युत तारांच्या संपर्कात आल्याने एकाचा मृत्यू झाला आहे. निर्मोद लगून (29) असे मृत व्यक्तीचे नाव असून तो मूळचा झारखंडचा रहिवासी आहे. सदर घटना 16 नोव्हेंबरला घडली.

गोव्याच्या सुयश, स्नेहलची शतके

विजय हजारे करंडक एकदिवसीय सामन्यांच्या क्रिकेट स्पर्धेत नागालँडविरुद्ध गोव्याने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ६ बाद ३८३ धावा केल्या. सुयश प्रभुदेसाई (नाबाद १३२) व स्नेहल कवठणकर (११४) यांनी शतके ठोकली, तर ईशान गडेकरने (५४) अर्धशतक केले.

कॅप्टन ऑफ पोर्टजवळ दुचाकी व कारमध्ये अपघात 

कॅप्टन ऑफ पोर्टजवळ अपघात. जंक्शन ओलांडून येथ असलेल्या दुचाकीला कारची धडक. सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नसून दुचाकीचे मात्र नुकसान झाले आहे. दुचाकीस्वार महाविद्यालयीन तरुण असल्याचे निदर्शनास.

accident
accidentDainik Gomantak

कलेक्टर कार्यालय नव्या इमारतीत हलविण्याचा मोन्सेरात यांचा सल्ला

महसूल मंत्री बाबुश मोन्सेरात यांनी पणजी येथील कलेक्टर इमारतीची तपासणी केली. तसेच इमारतीच्या स्थितीचा आढावा घेतला. सीएसआर निधीतून 'जीएसआयडीसी'च्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या इमारतीत कार्यालय हलविण्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिला.

बाबुश मोन्सेरात
बाबुश मोन्सेरातDainik Gomantak

आधी रडले आता मागितली माफी!

आरजीचे प्रमुख मनोज परब गुरवारी आपल्या फेसबुक लाईव्हवर ढसाढसा रडले होते. शुक्रवारी त्यांनी फेसबुकवर 'आपण भावनिक झालो त्याबद्दल माफी असावी. मला माझे आरजी कुटुंब नेहमी भक्कम हवे आहे.' असे पोस्ट करत सांगितले.

Manoj Parab
Manoj ParabDainik Gomantak

झोपेतून उठून त्याने मदतीसाठी हाक दिली अन् तिथेच कोसळला! पर्यटकाचा हॉटेल रूममध्ये मृत्यू...

गुजरातमधील एका पर्यटकाचा आकस्मिक मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उपलब्ध माहितीनुसार, कोलवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अनैसर्गिक मृत्यूची नोंद झाली आहे. तिथल्या एका हॉटेलमध्ये राहत असलेल्या मूळ गुजरात येथील एकाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

सुमंता फर्नांडिसच्या सासूवर हुंडाबळीचा गुन्हा दाखल!

मायणा-कुडतरी येथील सुमंता फर्नांडिस मृत्यूप्रकरणी कुडतरी पोलिसांनी सासू पॅट्रोसीना फर्नांडिस यांच्याविरोधात हुंडाबळीचा गुन्हा दाखल केला आहे. सासरच्या छळाला कंटाळून सुमंताचा 30 ऑगस्टला मृत्यू झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com