मडगाव: पाच युवकांना बेकायदेशीररीत्या ताब्यात घेऊन त्यांना पोलिस कोठडीत मारहाण केल्याप्रकरणी शुक्रवारी गौरव नाईक व संकेत नाईक या दोन उपनिरीक्षकांना निलंबित करण्यात आले. या मारहाण प्रकरणात त्यांचाही हात असल्याचे प्रथमदर्शनी पुराव्यांतून स्पष्ट झाले आहे. सलग दोन दिवसांत एकूण चार जणांवर झालेल्या कारवाईमुळे पोलिसांची अब्रू पूर्णतः वेशीवर टांगली गेली आहे.
या मारहाण प्रकरणी गुंतलेले हवालदार समीर सुधीर तसेच पोलिस शिपाई पुंडलिक परीट व चेतन कोळी यांना यापूर्वीच निलंबित करण्यात आले होते. दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक शेखर प्रभुदेसाई यांच्याशी संपर्क साधला असता गौरव नाईक व संकेत नाईक या दोन्ही उपनिरीक्षकांना निलंबित केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, पणजी पोलिस मुख्यालयातून हा आदेश जारी करण्यात आल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, ६ जून रोजी रात्री रामनगरी-नेसाय येथे दोन गटांमध्ये मारहाण झाली होती. त्यानंतर एका अल्पवयीन मुलासह पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले होते.
घटनाक्रम असा
६ जून : रात्री १० च्या सुमारास मायणा-कुडतरी पोलिसांनी ५ जणांना ताब्यात घेतले. पाच पोलिसांनी त्यांचे कपडे काढून चामड्याच्या पट्ट्यांनी मारहाण्ा केली.
७ जून : सकाळी कोणताही वैद्यकीय उपचार न करता या युवकांना सोडण्यात आले. अखेरीस त्यांच्या शेजाऱ्यांनी त्यांना उपचारासाठी नेले.
९ जून : या प्रकरणाचा गवगवा झाल्यानंतर पोलिस शिपाई चेतन कोळी याला निलंबित करण्यात आले.
१० जून : लिओना बारेटो यांनी पाच पोलिसांविरोधात तक्रार दाखल केली.
११ जून : हवालदार समीर सुधीर आणि पोलिस शिपाई पुंडलिक परीट यांना निलंबित करण्यात आले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.