Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी संशयिताला अटक; मायणा-कुडतरी पोलिसांची कारवाई

Goa Crime News: सासष्टीतील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून मायणा-कुडतरी पोलिसानी संशयिताला अटक केली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Crime News: सासष्टीतील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून मायणा-कुडतरी पोलिसानी संशयिताला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या या संशयिताचे नाव सॅल्डन फालेरो असे असून रविवारी मध्यरात्रीच्या सुमाराला त्याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ जून २०२४ रोजी संशयिताने या अल्पवयीन मुलीला आपल्यासोबत नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्यानंतर एका जागी सोडले. ही बाब पालकांना समजल्यानंतर मायणा-कुडतरी पोलिस स्थानकात याप्रकरणी तक्रार करण्यात आली.

या प्रकरणात तथ्य असल्याचे पाहून पोलिसांनी वरील संशयिताविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या ३६३ (अपहरण करणे) ३७६ (१) (३), गोवा चिल्ड्रन्स ॲक्टच्या ८(२) आणि ‘पोक्सो’ कायद्याच्या ४ कलमाखाली गुन्हा नोंद करण्यात आला. वरील संशयिताला १६ जून २०२४ रोजी मध्यरात्रीच्या सुमाराला अटक करण्यात आली असून महिला उपनिरीक्षक वेरोनिका कुतिन्हो याप्रकरणी तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Fire: थिवीत 'अग्निकांड', शॉर्ट सर्किटमुळे घराला आग; 5 लाखांचे नुकसान!

Salt Lake Stadium: ममता बॅनर्जींनी मागितली मेस्सीची माफी; मैदानावर घडलेल्या घटनेबाबत व्यक्त केली नाराजी, चौकशी समिती स्थापनेचे आदेश

Goa Nightclub Fire: 'रोमिओ लेन' क्लबचे 18 महिने बेकायदेशीर ऑपरेशन; दिड वर्ष कोणाचेही लक्ष नव्हते?

Goa Live Updates: 'कॅश फॉर जॉब'ची राष्ट्रपतींकडून दखल

Lionel Messi In India: मेस्सी आला अन् मैदानात तूफान राडा, चाहत्यांनी पाण्याच्या बाटल्या, खुर्च्या फेकल्या, टेंट उखडले, काहीजण जखमी Watch Video

SCROLL FOR NEXT