Mapusa Theft News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: घरकाम करणाऱ्या मोलकरणीनेच घातला मालकिणीला गंडा; मेरशीत फ्लॅटमधून 5 लाखांचे दागिने लंपास

Mapusa Theft News: मेरशी येथील एका मोलकरणीला गोवा पोलिसांनी 5 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरल्याप्रकरणी अटक केली

Akshata Chhatre

म्हापसा: चोर किंवा गुन्हेगार हा नेमका कोणत्या रूपात दडलेला असेल हे सांगता येत नाही. मेस्ताभाट-मेरशी येथील एका मोलकरणीला गोवा पोलिसांनी 5 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरल्याप्रकरणी अटक केली आहे. काशीबाई लक्ष्मिकांत नायक ही मूळची हंपी कर्नाटक येथील असल्याची माहिती उघड झाली आहे.

फिर्यादी सिडनी मेसीर यांनी नोंदवलेल्या तक्रारीनुसार काशीबाई त्यांच्या घरी कामाला होती. सिडनी मेसीर या अबनेर रेसिडेन्सीमध्ये राहतात आणि मंगळवारी (दि. 12 नोव्हेंबर) रोजी संध्याकाळी 6:30च्या सुमारास ही घटना घडली असल्याची तक्रार त्यांनी पोलीस ठाण्यात दाखल केली.

आरोप करताना त्यांना एकूण 5 लाख रुपयांचे दागिने लंपास करण्यात आल्याची माहिती पोलिसांना दिली. यामध्ये 6 बांगड्या, 1 हार आणि एका अंगठीचा समावेश होता. काशीबाईने फिर्यादयाच्या आईचे कपाट उघडून दागिने पळवले, रात्री एकूणच प्रकार लक्षात आल्यांनतर त्यांनी थेट पोलीस स्थानकात धाव घेतली आणि तक्रार नोंदवली.

फिर्यादीने नोंदवलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी संशयित आरोपीला कांदोळी येथून ताब्यात घेत अटक केली आहे. तसेच तिच्याकडून चोरलेले सर्व दागिने जप्त केले आहेत. सध्या एकूण प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जस्विता नाईक या करीत आहेत.

पेडणे तालुक्यात चोऱ्यांचे प्रमाण वाढले

पेडणे येथे गेल्या काही दिवसांत चोरीच्या घटना खूप वाढल्या आहेत. सातत्याने चोरीच्या घटना समोर येतायेत. अशीच चोरीची आणखी घटना पेडणे येथून समोर आली आहे. मूळचा महाराष्ट्रातील असणाऱ्या रुपेश कांबळी नावाच्या चोरट्याने चोरीच्या इराद्याने प्रभावती प्रसाद नावाच्या महिलेच्या घरात घुसखोरी केली. यादरम्यान प्रभावती यांनी रुपेशचा सामना केला असता त्याने कोयत्याने त्यांच्यावर हल्ला केला.

या हल्ल्यात प्रभावती जखमी झाल्या. रुपेश प्रभावती यांचे मंगळसूत्र, एक लाखाची रोकड घेवून पसार होण्यात यशस्वी झाला. पण या घटनेची माहिती मिळताच पेडणे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत कौठळी येथून रुपेशच्या मुसक्या आवळल्या. प्रभावती सध्या बांबोळी येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

MS Dhoni Retirement: 'कॅप्टन कूल'च्या निवृत्तीबद्दलचा सस्पेन्स संपला! एमएस धोनी IPL 2026 खेळणार की नाही? CSK च्या CEO ने स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

Horoscope: 2026 साठी काहीच दिवस बाकी! शनि-गुरूच्या हातात नशिबाचे चक्र, 'या' राशींना मिळणार भाग्याची खास साथ; मात्र काहींना साडेसातीचा धोका फार

अग्रलेख: फोंड्यात रविंचा उत्तराधिकारी कोण?

कष्टकरी वर्गाच्या आवाजाला मिळाली ताकद, झोहरान ममदानी ठरले आशेचे प्रतीक - संपादकीय

NSA In Goa : गुन्हेगारी कृत्यांवर वचक ठेवण्यासाठी गोवा सरकारने उचलले मोठे पाऊल, राज्यात राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू

SCROLL FOR NEXT