Mahesh Amonkar Dainik Gomantak
गोवा

पुन्हा राजीनामासत्र सुरू; तृणमूलच्या आमोणकरांचा पक्षाला राजीनामा

आर्थिक मदती व्यतिरिक्त पक्षाने इतर कोणतेही सहकार्य केले नाही : महेश आमोणकर

दैनिक गोमन्तक

Trinamool Congress: 2022च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल काल 10 मार्चला जाहीर झाला असून सर्वाधिक मते मिळवून भाजप पुन्हा एकदा सत्तेत आला आहे. तर कॉंग्रेसला पुन्हा एकदा हार पत्करावी लागली आहे. टीएमसीच्या पदरी तर संपूर्ण निराशाच पडली आहे. या निवडणुकीत गोव्याच्या राजकारणात तग धरू पाहत असलेल्या तृणमूलला (Trinamool Congress) एकही जागा जिंकता आली नाही. त्यातच आता तृणमूलच्या एका उमेदवाराने पक्षाला राजीनामा दिला आहे. (Mahesh Amonkar of Trinamool congress resigns)

मडगाव मतदारसंघातून विधानसभेच्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचे उमेदवार म्हणून उभे राहिलेले महेश आमोणकर यांनी पक्षाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. निवडणुकीदरम्यान पक्षाच्या वरिष्ठ नेत्याकडून किंवा आय पॅककडून कोणतेही सहकार्य मिळाले नसल्यामुळे सदस्यपदाचा राजीनामा दिला असल्याचे त्यांनी सांगितले.

निवडणुकीला पाच दिवस शिल्लक असताना पक्षाच्या मुख्य कार्यकर्त्यांनी आपल्याशी असहकार्य करून आपला घात केला. यानंतर निवडणुकीला दोन दिवस असताना मी पक्षाच्या सदस्यपदाचा राजीनामा देण्याचे निश्चित केले होते. त्याप्रमाणे आज याची पूर्तता केली असल्याचे त्यांनी सांगितले.

मते कमी मिळली असल्याने मी दिगंबर कामत यांच्याकडे तडजोड केली, असा माझ्यावर आरोप करण्यात येत आहे. यात कोणतेही तथ्य नसल्याचे त्यांनी सांगितले. यापेक्षा दिगंबर कामत यांनी माझ्या नावाचा वापर करून मते मिळविली आहेत,असे माझ्या मित्रांनी दिलेल्या महितीवरून कळले आहे. या पुढेही त्यांच्याशी कोणतीही तडजोड करण्याची इच्छा नसल्याचे त्यांनी सांगितले.

तर यानंतर कुठल्या पक्षात प्रवेश करायचा हे मी माझ्या कार्यकर्त्यांशी बोलून ठरविणार असल्याचे त्यानी सांगितले. दरम्यान भाजपमध्येही जाण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

तृणमूल काँग्रेसचे मडगावातील (Margao) उमेदवार महेश आमोणकर यांनी नाराज होऊन पक्षाला राजीनामा दिला आहे. ते म्हणाले की, निवडणुकीच्या 5 दिवसांआधीच पक्षाने वार्‍यावर सोडले. आर्थिक मदती व्यतिरिक्त पक्षाने इतर कोणतेही सहकार्य केले नाही. यावर आता तृणमूल पक्षाची आणि खासकरून ममता दिदींची काय प्रतिक्रिया असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 26 August 2026: बुधवार 'या' राशींसाठी ठरणार वरदान! करिअरमध्ये मिळणार गरुडभरारीची संधी; उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होणार

Pilots Dope Test: वैमानिकांची आता वर्षातून एकदा होणार 'डोप टेस्ट'! DGCA लागू करणार नवा नियम; जाणून घ्या काय आहे नवा प्लॅन?

Headland Sada: पोस्ट खात्याची सदनिका बनली शेळ्यांचा निवारा! वर्षानुवर्षे दुर्लक्षामुळे सरकारी इमारत जीर्ण; भंगारवाल्याचाही शिरकाव

Lucky Zodiac Signs 2026: बुधाचे मघा नक्षत्रात गोचर! 'या' लकी राशींवर होणार पैशांचा पाऊस, रक्षाबंधनापर्यंत जॅकपॉट

Colvale Electricity Bills: कोलवाळात वीज बिले दुप्पट-तिप्पट! ग्राहकांना 17 हजारांपर्यंत बिलांचा फटका, फेरपडताळणीची मागणी

SCROLL FOR NEXT