Jainism History In Goa Dainik Gomantak
गोवा

Jainism History In Goa: बांदिवडे गावात होती जैन वस्ती; गोव्याचा अपरिचित इतिहास

Happy Mahavir Jayanti 2025: दरवर्षी भगवान महावीर जयंती देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. भगवान महावीर हे जैन धर्माचे 24 वे आणि शेवटचे तिर्थकार होते. महावीरांचा जन्मोत्सव जैन धर्मीय लोक मोठ्या जल्लाषोत साजरा करतात.

Manish Jadhav

Mahavira Janma Kalyanaka

फोंडा: दरवर्षी भगवान महावीर जयंती देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. भगवान महावीर हे जैन धर्माचे 24 वे आणि शेवटचे तिर्थकार होते. महावीरांचा जन्मोत्सव जैन धर्मीय लोक मोठ्या जल्लाषोत साजरा करतात. पंचांगानुसार, चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या त्रयोदशी तिथीला महावीर जयंती साजरी केली जाते. याच सुवर्ण जयंतीनिमित्त आज (10 एप्रिल) आपण या लेखाच्या माध्यमातून छोट्याशा गोव्याच्या प्राचीन इतिहासातील जैन धर्माचे महत्व? गोव्यातील प्राचीनकाळातील जैन मंदिरे आणि जैन वस्ती याविषयी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत.

गोव्यातील जैन वारसा

गोव्याच्या (Goa) इतिहासाचा धांडोळा घ्यायचा झाल्यास आपल्या डोळ्यांसमोर पटकन पोर्तुगीजांच्या जुलमी राजवटीचा इतिहास समोर येतो. इतिहासात आत्तापर्यंत पोर्तुगीज प्रभाव आणि ख्रिश्चन वारसा यावरच भर दिला गेला. मात्र गोव्याच्या प्राचीन इतिहासाकडे आपण सपशेल दुर्लक्ष करतो. गोव्याच्या प्राचीन इतिहासात जैन धर्माच्या वारशाच्या खुणा मिळतात. अलीकडेच झालेल्या पुरातत्त्वीय संशोधनातून गोव्याच्या प्राचीन इतिहासात जैन धर्माचे सुद्धा अस्तित्व असल्याचे स्पष्ट झाले आहे. गोव्यात अनेक ठिकाणी जैन मंदिरे, वारसा स्थळे आहेत. जी आपल्याला गोव्यातील जैन धर्माच्या अस्तित्वाची नव्याने ओळख करुन देतात.

फोंडा (Ponda) तालुक्यातील बांदिवडे गावात नेमिनाथ जैन मंदिराचे अवशेष आढळले. हे मंदिर विजयनगर साम्राज्याच्या काळातले असल्याचे सांगितले जाते. याशिवाय, नार्वे गावाजवळील कुडणेसह जैनकोट येथे जैन धर्माशी संबंधित वास्तू, मूर्त्याही पाहायला मिळतात. या ठिकाणांवरील अवशेष पाहता, पोर्तुगीजपूर्व काळात गोव्यात एक समृद्ध जैन व्यापारी समुदाय वास्तव्यास असल्याची प्रचिती येते. कुडणे, बांदिवडे आणि गुजीरवाडा यांसारख्या गावांत जैन वसाहती होत्या, ज्या नंतर पोर्तुगीज प्रभावामुळे नाहीशा झाल्या.

बांदिवडे येथील नेमिनाथ जैन वस्ती

बांदिवडे येथील भगवान नेमिनाथांचे मंदिर गोव्यातील जैन धर्माच्या अस्तित्वाचा पुरावा आहे. भगवान नेमिनाथ हे जैन धर्माचे 22 तिर्थकार होते. तर नागेशी येथील जैन शिलालेख भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या संग्राहालयात ठेवण्यात आला आहे. त्यात 14व्या शतकातील विजयनगर काळात या जैन वस्तीच्या पुनर्बांधणीचा उल्लेख आढळतो. याशिवाय, बांदिवडे येथील कन्नड शिलालेखात स्पष्ट उल्लेख करण्यात आला की, राजा श्रीपालाने बांदिवडे वसवले आणि नेमिनाथ जैन बस्तीची निर्मिती केली. चौरस आकारातील नेमिनाथांचे हे मंदिर लॅटराइटच्या दगडांपासून बांधलेले असून त्याला जाळीदार खिडक्या आहेत. बांधकामात मोठ्या प्रमाणात चुना वापरण्यात आला.

कुडणे येथील जैन मंदिर

कुडणे हे गाव चालुक्याच्या राजवटीतील एक प्राचीन वसाहत होती. ते उत्तर गोव्यातील डिचोली तालुक्यात स्थित आहे. हे गाव अरवळे गुहांपासून सुमारे 3 किलोमीटर अंतरावर आहे. कुडणे येथे विजयनगर कालखंडातील एक प्राचीन प्रसिद्ध जैन मंदिर आहे. हे मंदिर महत्त्वाचे ऐतिहासिक स्थळ मानले जाते. अलीकडेच झालेल्या उत्खननांमधून काही रंजक गोष्टी समोर आल्या.

मंदिरात मुखमंडप आणि गर्भगृह असून ते 2 मीटर उंचावर लॅटराइट दगडांनी बांधलेले आहे. 8 x 8.30 मीटर आकाराच्या मुखमंडपमध्ये चार स्तंभ असून दोन्ही बाजूंच्या भिंतींवर प्रत्येकी चार स्तंभ आहेत. उत्खननात सापडलेल्या लॅटराइट दगडांवरुन मुखमंडपात कमानीही अस्तित्वात असल्याचे सूचित होते. तसेच, उत्खननात सापडलेल्या चुन्यावरुन स्पष्ट होते की, बांधकामासाठी मोठ्याप्रमाणात चुन्याचा वापर त्यावेळी करण्यात आला असावा. विशेष म्हणजे, गोव्यातील मध्ययुगीन काळातील हे एकमेव मंदिर आहे.

कुडणे येथील हे जैन मंदिर नार्वे येथील सप्तकोटेश्वर मंदिर आणि पारोडा येथील चंद्रनाथ मंदिराशी वास्तुशैलीत साम्य असलेले आहे. विशेष म्हणजे, हे मंदिर त्या शैलीतील सुरुवातीचे उदाहरण असावे, असे मानले जाते. जानेवारी 1684 मध्ये मुघल सम्राट औरंगजेबाच्या सैन्याने डिचोली शहर जाळले आणि पीळगाव येथील रामचंद्र मंदिर उद्ध्वस्त केले. इतिहासकारांचे मते, हे जैन मंदिरही त्या काळातच नष्ट झाले असावे. कुडणे येथील जैन मंदिराभोवतीचे उत्खनन गोव्यातील जैन धर्माच्या इतिहासासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरले आहे.

जैन वारसा जपण्याची गरज

दरम्यान, आजच्या काळात गोव्यातील जैन वारसा जपण्याची गरज निर्माण झाली आहे. गोव्यातील प्राचीनकालीन जैन मंदिरे एक समृद्ध ठेवा आहेत. सरकारसह प्रत्येक गोमंतकीयांनी हा ठेवा जतन केला पाहिजे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: आम्ही रशियासह भारतालाही गमावले! राजनैतिक संबंध विकोपाला गेल्याची ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत

Horoscope today: अनंत चतुर्दशी 2025, बाप्पाचा 'या' 4 राशींवर राहील आशिर्वाद; आर्थिक आणि कौटुंबिक जीवनात समृद्धी मिळेल

BITS Pilani: उलटीमुळे श्‍‍वास गुदमरून झाला मृत्‍यू, तणावाखालील ऋषीला नव्हता 'बिट्स'चा आधार; पेशंट स्वतःहून उपचारासाठी आला नाही, ही सबब पुढे

Goa: पाण्‍याचा जितका वापर, तितकेच शुल्‍क; पेयजल विभागाची अधिसूचना जारी, घरगुती ग्राहकांना बिलात सवलत

Goa Education: एकशिक्षकी शाळांचा प्रश्न सुटणार; सरकारी शाळांना अतिरिक्त शिक्षक पुरविले जाणार, CM सावंतांची घोषणा

SCROLL FOR NEXT