Tambadi Surla Dainik Gomantak
गोवा

प्राचीन तांबडीसुर्ला मंदिरात स्वहस्ते दुग्धाभिषेक

शिव मंदिरात पहाटे सुमारे 4 वाजल्यापासून भाविकांना स्वहस्ते शिव पिंडीवर दुग्धाभिषेक घालण्यासाठी मंडपामध्ये रांगा लागल्या होत्या.

दैनिक गोमन्तक

तांबडीसुर्ला: तांबडीसुर्ला येथील प्राचीन श्री महादेव मंदिरात महाशिवरात्रोत्सव भाविकांनी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. तसेच खातकोण, साकोर्डा येथील महादेव मंदिरात देखील शिवरात्रोत्सव थाटामाटात पार पडला. (mahashivratri celebration in goa)

तांबडीसुर्ला येथील शिव मंदिरात पहाटे सुमारे 4 वाजल्यापासून भाविकांना स्वहस्ते शिव पिंडीवर दुग्धाभिषेक घालण्यासाठी मंडपामध्ये रांगा लागल्या होत्या. गर्भकुडीतील शिव पिंडीवर दुग्धाभिषेक घालण्यासाठी भाविकांना तासनताल प्रतीक्षा करावी लागल्यावर गटागटाने प्रवेश देण्यात येत होता. भाविक मोठ्या मनाने दूध, बेल, फुले, केळी आदीं स्वहस्ते पिंडीवर अर्पण करून मनोभावे पूजा करण्यात आली. काही भाविकांनी यावेळी नंदीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले होते. त्यासाठी भाविकांना वेगळ्या रांगेत उभे राहण्याची वेळ आली होती.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) , सावर्डेचे माजी आमदार दीपक पाऊसकर यांनी दुपारी येथे उपस्थिती दर्शन घेतले.

भाविकांनी दुपारी महानैवेद्याचा आस्वाद घेतला. संध्याकाळी उशिरापर्यंत भाविकांनी अभिषेक केले. पोलिस निरीक्षक संजय दळवी यांच्या नेतृत्वाखाली पोलिस कर्मचारी, रहदारी पोलिस, गृहरक्षक जवान यांनी गर्दी व रहदारीवर चोख नियंत्रण ठेवले होते. शिवरात्रोत्सवाची कीर्तनाने सांगता झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'प्रमोद सावंतांमध्ये रोखण्याची हिम्मत नाही', जमिनीचा मालकी हक्क देण्याचा केजरीवालांनी 'मये'वासीयांना केला वायदा

Goa Crime: सुर्ला येथे फेरीबोट कर्मचाऱ्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला, दोघांना अटक

Rohit Sharma Captaincy: "आम्हाला युवा खेळाडूंना संधी द्यायचीय", रोहित शर्माला कर्णधारपदावरून का काढलं? अजित आगरकरांनी सांगितलं खरं कारण

'अमित पाटकरांची खाण प्रमोद सावंतांच्या आशिर्वादाने सुरुये, दोघेही गोमंतकीयांना मूर्ख बनवतायेत'; अरविंद केजरीवाल

रश्मीका-विजयने गुपचूप उरकला साखरपूडा; दोन महिन्यात होणार 'शुभमंगल सावधान'!

SCROLL FOR NEXT