Maharashtrawadi Gomantak Party | MGP News | MAG News | Goa election result 2022 news updates Daiik Gomantak
गोवा

गोव्यात मगोचं किंगमेकर होण्याचं स्वप्न भंगलं

चारपैकी तीन मतदारसंघांत भाजपचे उमेदवार विजयी, दीपक ढवळीकरही पराभूत

दैनिक गोमन्तक

फोंडा : विधानसभा निवडणुकीच्‍या निकालानंतर फोंडा तालुक्यात भाजपचा दबदबा दिसून आला. चारपैकी तीन मतदारसंघांत भाजपचे उमेदवार विजयी झाले. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मगोचे पक्षाध्यक्ष दीपक ढवळीकर यांचा प्रियोळ मतदारसंघात झालेला पराभव. ढवळीकर जिंकणार अशी हूल सगळीकडे उठली होती. उद्योजक संदीप निगळ्ये हे अपक्ष म्हणून रिंगणात उतरल्यामुळे त्यांच्यात आणि गोविंद गावडे यांच्‍यात मतांचे विभाजन होऊन ढवळीकर बाजी मारतील असा अंदाज वर्तवला जात होता, पण तो खोटा ठरला. (Goa election result 2022 news updates)

आपण कमीत कमी पाच हजार मतांनी विजयी होणार असे वक्तव्य दीपक ढवळीकर यांनी केले होते. पण शेवटी गोविंद गावडे यांनीच बाजी मारली. हीच गोष्ट शिरोड्याची. शिरोड्यात सुभाष शिरोडकर यांच्‍याविरोधी वातावरण असल्याचे दिसत होते. त्यामुळे आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party) महादेव नाईक हे विजयी होणार अशी चर्चा सुरू होत होती. पण शेवटी शिरोडकरच जिंकले. फोंड्यात काँग्रेसचे राजेश वेरेकर आणि मगोपचे डॉ. केतन भाटीकर यांच्यात लढत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र, माजी मुख्यमंत्री रवी नाईक हे थोड्या फरकाने का होईना विजयी झालेच. हा मगोपला बसलेला जबरदस्त धक्का म्हणावा लागेल.

सुदिन ढवळीकर जरी विजयी झाले, तरी त्यांचे बंधू दीपक ढवळीकर व फोंड्यात केतन भाटीकर यांचा पराभव अंतर्मुख करणारा ठरू शकेल. आपल्या पक्षाला कमीत कमी पाच जागा मिळतील असे सांगणाऱ्या मगोपच्या पदरात फक्त दोनच जागा पडू शकल्या. यावेळी राजकारणात आपण ‘किंगमेकर्स’ बनणार अशी जी समजूत मगोपने करून घेतली होती, तिचे तीनतेरा वाजल्‍याचे दिसून येत आहे. तृणमूलशी (TMC) केलेली युती मगोपच्या अंगलट आली अशी चर्चा सध्या फोंडा तालुक्यात सुरू आहे. पण काही का असेना या निवडणुकीने मगोप अधिकच पिछाडीवर गेल्याचे दिसून येते.

गेल्या निवडणुकीसारखा यंदाही मगोपचा (MGP) रथ फक्त सुदिन ढवळीकर हाकणार हे स्‍पष्‍ट झाले आहे. आता मात्र त्‍यांना आपल्या रणनीतीचा फेरविचार करावा लागेल. फक्त दोन वा तीन जागा मिळवून राजकारणात स्थान बनविणे कठीण आहे याची जाणीव त्यांना आता व्हायला हवी. मागच्या वेळी मगोपला तीन जागा मिळाल्या होत्या. पण यावेळी युद्धपातळीवर प्रचार करूनही मगोपला केवळ दोन जागा मिळणे यातच त्‍या पक्षाची दुरावस्था स्पष्ट होते. हे पाहता फोंडा तालुक्यात एकीकडे भाजपचा दबदबा, दुसरीकडे मगोपची पिछाडी तर तिसरीकडे काँग्रेसचा धुव्वा असेच चित्र दिसून आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Manoj Bajpayee At IFFI: 'वेळेत पूर्णविराम आणि संवादात मौन हवे'; मनोज वाजपेयीने सांगितले अभिनेत्यांबाबतीत दोन टप्पे

Indian Navy Goa: गोव्यात नौदलाच्या जहाजाचा अपघात; मच्छिमारांच्या बोटीला धडक, दोन बेपत्ता, 11 जाणांना वाचविण्यात यश

IFFI 2024: इफ्फीच्या पहिल्या दिवशी ‘All We Imagine As Light’ ची चर्चा! छाया कदम, कानी कसूरती, दिव्या प्रभा यांचा सशक्त अभिनय

Saint Francis Xavier Exposition: जुन्या गोवेत देशी-विदेशी भाविकांची गर्दी! कार्डिनल फिलिप नेरी फेर्रांव यांनी प्रार्थना घेऊन केला शुभारंभ

Electricity Tariff Hike: वीज दरवाढीच्या शिफारशींना ‘जीसीसीआय’चा आक्षेप; पर्यटन व्यवसायावर प्रतिकूल परिणाम होण्याची शंका

SCROLL FOR NEXT