Calangute Drunk Drive Case Dainik Gomantak
गोवा

Calangute Drunk Drive Case: कळंगुटमध्ये दारुच्या नशेत गाडी चालवणाऱ्या महाराष्ट्रातील पर्यटकाला कोर्टाचा दणका, ठोठावला 11,500 रुपयांचा दंड

Calangute Drunk Drive Case: चालक मद्याच्या नशेत वाहन चालवताना आढळून आला होता.

Pramod Yadav

Calangute Drunk Drive Case: गोव्यातील वाढते अपघात पाहता राज्यात वाहतुकीचे नियम सक्त करण्यात आले आहेत. मद्याच्या नशेत वाहन चालवणाऱ्यांविरोधात पोलीस कारवाई केली जात आहे.

नुकतेच कळंगुटमध्ये दारुच्या नशेत वाहन चालवणाऱ्या वाहन चालकाला कोर्टाने दणका दिला असून, दंड ठोठावला आहे.

रेवानाथ मुसळे (रा. महाराष्ट्र) असे या वाहन चालकाचे नाव असून, तो मद्याच्या नशेत वाहन चालवताना आढळून आला होता.

पोलिसांनी केलेल्या तपासणीत त्याच्या रक्तात 102.8mg/100ml मद्य आढळून आले होते.

म्हापसा न्यायालयाने चालकाला दोषी ठरवून त्याला 11,500 रुपयांचा दंड ठोठावला आहे.

राज्यात मद्य प्राशन करुन वाहन चालवणाऱ्या चालकांविरोधात कठोर कारवाई केली जात आहे. नशेत असणाऱ्या वाहन चालकांवर वाहतूक पोलीस लक्ष ठेऊन आहेत.

नियमानुसार रक्तात 30mg/100ml मद्याचे प्रमाण आढळ्यास त्याला कारवाई केली जात नाही. त्यापेक्षा जास्त आढळ्यास कारवाई केली जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT