Maharashtra Pilgrims for Old Goa Exposition Dainik Gomantak
गोवा

Saint Francis Xavier Feast: सायबाच्या श्रद्धाळूंची 'पायीवारी'!फेस्तासाठी महाराष्ट्रातून शेकडो भाविक गोव्यात दाखल

Maharashtra Pilgrims for Old Goa Exposition: अवरलेडी सायबिणीच्या चर्च परिसरात भाविकांनी रात्रीचा मुक्काम केला, या भाविकांमध्ये ख्रिशन बांधवांसह हिंदू बांधवांचाही समावेश आहे.

Akshata Chhatre

Saint Xavier Feast, Old Goa

डिचोली: गोंयच्या सायबाच्या दर्शनाच्या ओढीने महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातून यंदाही शेकडो भाविक पायीवारी करीत गोव्यात आले आहेत. रविवारी (१ डिसेंबर) सायंकाळी हे भाविक दोडामार्गच्या वाटेने डिचोलीत पोचले आणि शहरातील अवरलेडी सायबिणीच्या चर्च परिसरात भाविकांनी रात्रीचा मुक्काम केला. या भाविकांमध्ये ख्रिशन बांधवांसह हिंदू बांधवांचाही समावेश आहे.

सोमवारी( दि. २ डिसेंबर) रोजी पहाटे मार्गस्थ झालेले हे भाविक दुपारपर्यंत जुने गोवे येथे पोहोचले. मंगळवारी (दि .३) रोजी गोंयच्या सायबाचे अर्थातच सेंट फ्रांसिस झेवीयरचे फेस्त साजरे होणार आहे आणि या फेस्तात हे भाविक सहभागी होणार आहेत.

सोळाव्या शतकातील फ्रांसीस झेवियर हे सुखी जीवनाचा मार्ग दाखवणारे संत आहेत. याच भावनेने गोंयच्या सायबाच्या फेस्तानिमित्त महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील भाविक दरवर्षी पायीवारी करीत जुने गोव्यात येतात. यंदाही जवळपास ५०० भाविक गोव्यात आले आहेत. गेल्या वीस वर्षांहून अधिक वर्षांपासून पायीवारीचा हा उपक्रम सुरु असून, आता भाविकांमध्ये वाढ झाली आहे.

महाराष्ट्रातील आजरा येथील रोझरी चर्चकडून तर गडहिंग्लज येथील सेंट अँथोनी चर्चकडून या पायीवारीला सुरुवात झाली होती. आजऱ्यासह गडहिंग्लज, पुणे आदी काही भागातील भाविक पायीवारी करीत आजरा, नेसरी, भेडशीमार्गे रविवारी सायंकाळी डिचोलीत पोचले.

अन्य भागातून आलेले काही भाविक आजरा येथे पायीवारीत सहभागी झाले. या भाविकांमध्ये महिलांचा समावेश आहेच मात्र सोबतच युवकांपासून सत्तरी ओलांडलेल्या भाविकांचाही यामध्ये समावेश पाहायला मिळतो. काही भाविकांनी तर सोबत आपल्या लहान मुलांना आणले आहे.

रविवारी सायंकाळी हे भाविक डिचोलीत पोचताच चर्चतर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. चर्चतर्फे या भाविकांची चहापान आणि निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली, त्यानंतर रात्री भाविकांनी अवरलेडी सायबिणीच्या चर्चमध्ये प्रार्थनाही केली. ''गोंयच्या सायबा''वर श्रद्धा ठेवून पायीवारीला प्रारंभ केल्याचे अनेक भाविकांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arambol: 'शेतकऱ्यांची रोजीरोटी नष्ट करून कोणता विकास करणार'? पोलिस बंदोबस्तात टॉवर उभारणी; हरमलवासीय संतप्त

Comunidade Law: कोमुनिदाद कायदा दुरुस्तीस आव्हान! स्थगितीची मागणी नाकारली; पुढील सुनावणी 13 नोव्हेंबर रोजी

Unity Mall Goa Controversy: 'पंचायत परवाना मिळेपर्यंत युनिटी मॉलचे काम नाही'! सरकारची न्‍यायालयाला हमी

Goa Jail: कैद्यांच्या जेवणावर होणार 90 ऐवजी 123 रुपये खर्च! दरवाढ लागू; पोषणमान, महागाईचा विचार करून निर्णय

Goa River Marathon: 14 डिसेंबर रोजी रंगणार 'गोवा रिव्हर मॅरेथॉन'! साडेसात हजारांहून जास्त धावपटू होणार सहभागी

SCROLL FOR NEXT