Maharashtra Day at Goa Raj Bhavan  Dainik Gomantak
गोवा

Maharashtra Day 2023: गोवा राजभवनवर महाराष्ट्र दिन साजरा; राज्यपाल म्हणाले...

राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई यांनी केले छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

दैनिक गोमन्तक

एक भारत श्रेष्ठ भारत अभियानांतर्गत गोवा राजभवनच्या दरबार हॉलमध्ये महाराष्ट्र आणि गुजरात दिन साजरा करण्यात आला. राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

Maharashtra Day at Goa Raj Bhavan

यावेळी बोलताना राज्यपाल म्हणाले भारत अनेक जाती, धर्म पंथांचा देश आहे. मात्र या देशातील एकता, अखंडता आणि आदर्श लोकशाही इतरांना प्रेरक आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आदर्श आज प्रेरणादायी आहे. महाराष्ट्र मंडळाच्या वतीने यावेळी राज्यपालांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष अनिल पाटील आणि गुजरात समाजच्या काजल शहा यांनी आपले मत व्यक्त केले.

Maharashtra Day at Goa Raj Bhavan

1 मे हा महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन. स्वातंत्र्याच्यानंतर काही काळ गुजरात आणि महाराष्ट्र हे दोन्ही राज्य मुंबई प्रांताचे भाग होते. दोन्ही भाषिकांकडून स्वतंत्र राज्याची मागणी केली जात होती. त्यानंतर याच दिवशी 1960 साली तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. पंडितजींनी यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राचा मंगलकलश दिला आणि नव्या महाराष्ट्राच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपविली. 

Maharashtra Day at Goa Raj Bhavan

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT