Deadbody Dainik Gomantak
गोवा

Tragic Death: चौथ्या मजल्यावरून खाली पडला; महाराष्ट्रातील ठेकेदाराचा गोव्यात मृत्यू

Goa News: पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: कुजिरामधील एका अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरून खाली पडून एका बांधकाम ठेकेदाराचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली. जखमी अवस्थेत आढळलेले ठेकेदार जितू तळेकर (वय अंदाजे ५०, रा. महाराष्ट्र) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

ही घटना समजताच जुने गोवे पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, हा मृत्यू अपघाती की यामागे अन्य कोणते कारण आहे, याचा तपास पोलिस करत आहेत. तळेकर हे कुजिरा परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास होते. शनिवारी (१२ जुलै) सकाळी अचानक चौथ्या मजल्यावरून खाली पडल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली.

पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी जुने गोवे पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिस अधिक तपास

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT