Party Dainik Gomantak
गोवा

15 ऑगस्टला महादेव सट्टा ॲपची गोव्यात 'फॅमिली पार्टी', दुबईतून बुकीज लावणार हजेरी

Mahadev Satta App: काही बुकी कारने गोव्यात दाखल होत आहेत. तर काहीजण विमानाने दाखल होत आहेत.

Pramod Yadav

पणजी: महादेव ऑनलाइन सट्टा ॲपच्या प्रमोटर्सकडून 15 ऑगस्ट रोजी गोव्यात मोठ्या 'फॅमिली पार्टी'चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये महादेव सट्टा ॲपशी संबंधित विविध राज्यातील 400 हून अधिक बुकी हजेरी लावणार आहेत. विशेष म्हणजे दुबईतून देखील काहीजण या पार्टीसाठी गोव्यात येणार आहेत.

एका नामांकित हिंदी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, भविष्यातील धोरण ठरविण्यासाठी 'फॅमिली पार्टी'चे आयोजन करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. उपस्थित राहणारे सर्व बुकी महादेव सट्टा ॲपसाठी कुठे ना कुठे काम करत आहेत.

पोलिस या पार्टीवर लक्ष ठेवून आहेत. पार्टीसाठी गोव्यात येणाऱ्या बुकींवर लक्ष ठेवले जात आहे. महादेव सट्टा ॲपमध्ये आतापर्यंत फक्त मुलेच काम करत होते. आता यात मुलींचाही समावेश केला जाणार आहे. मुलींवर सहज संशयही येत नाही त्यामुळे त्यांना सट्टाचे काम दिले जाणार आहे. या मुलींना राहण्यासाठी फ्लॅट आणि मासिक पगार दिला जाईल, अशी माहिती समोर आली आहे.

काही बुकी कारने गोव्यात दाखल होत आहेत. तर काहीजण विमानाने दाखल होत आहेत. यात नवीन लोकांना देखील समाविष्ट करुन घेण्यासाठी ऑफर्सही दिल्या जात आहेत.

पोलिस आणि ईडीने देशभरात ऑनलाइन सट्टेबाजी ॲपच्या ऑपरेटर्सच्या विरोधात मोहीम राबवत अटक सत्र सुरु केले आहे. छत्तीसगडमध्ये या कामावर बंधण येत असल्याने सट्टेबाजांचा पुढचे लक्ष्य दिल्ली, मुंबई, पुणे आणि हैदराबाद आहे.

महादेव सट्टा ॲपला तीन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल 2022 मध्ये दुबईमध्ये सक्सेस पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीला बॉलिवूडमधील अनेक कलाकार आणि सिने कलाकारांनी हजेरी लावली होती. त्याचा व्हिडिओ इंटरनेट मीडियावरही प्रसिद्ध झाला होता.

यानंतर सौरभ चंद्राकरच्या लग्नाचा व्हिडिओ समोर आला होता. या लग्नावर 200 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bangladesh Violence: बांगलादेशात माणुसकीला काळिमा! हिंदू तरुणाची निर्घृण हत्या, मृतदेह झाडाला टांगून जाळला Watch Video

Margao: मडगावात पादचारी पूल बंद! टॅक्सीचालक, दुकानदारांमध्ये नाराजी; साबांखा मंत्र्यांनी केली पाहणी

Goa Liberation Day: 'ऑपरेशन विजय'च्या शूरवीरांना सलाम! राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह अनेक नेत्यांकडून 'गोवा मुक्ती दिना'च्या शुभेच्छा

Mopa Airport: पहिल्यांदा गोव्यातच! ‘मोपा’ विमानतळावर डिजिटल व्हिडिओवॉल; भारतातील पहिलेच डिझाईन

रॉड्रीक्स यांच्या प्रयत्नाने मुंबईत गोमंतकीयांची प्रचंड सभा भरली, 20 हजार गोवावासीय उपस्थित होते; ‘छोडो गोवा’ ठराव संमत झाला

SCROLL FOR NEXT