Mahadayi water dispute in Goa  Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water: 'गोवा विधानसभा अधिवेशनात ‘म्हादई’साठी एक दिवस ठेवा';विरोधी पक्षनेत्याची मागणी

Goa: डीपीआरला मंजुरी दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय आमदारांची बैठक बोलाविली होती, परंतु त्या बैठकीवर विरोधी गटाच्या सातही आमदारांनी बहिष्कार घातला होता.

दैनिक गोमन्तक

Mahadayi Water: म्हादईच्या कळसा-भांडुरा प्रकल्पाच्या कर्नाटकच्या सुधारित डीपीआरला (डिटेल्स प्रोजेक्ट रिपोर्ट) केंद्रीय जल लवादाने परवानगी दिली आहे. त्यामुळे गोव्यात सध्या म्हादईचे पाणी वळवण्याच्या प्रकरणावरून जनआंदोलन उभारण्याची तयारी सुरू झाली आहे.

त्यामुळे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी येत्या विधानसभा अधिवेशनात म्हादईच्या विषयावर चर्चेसाठी संपूर्ण एक दिवस ठेवावा, अशी मागणी सभापती रमेश तवडकर यांना ट्विट टॅग करीत केली आहे. याविषयी आपण सभापतींना पत्र लिहिणार असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

राज्यात सध्या म्हादईच्या कळसा-भांडुरा प्रकल्पावरून सत्ताधारी भाजपविरोधी सर्व पक्ष उभे ठाकले आहेत. त्यात सेव्ह म्हादईच्या नावाखाली काँग्रेसह इतर पक्षांतर्फे साखळीत म्हणजेच मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात 16 रोजी जाहीर सभा घेण्यात येणार आहे.

तत्पूर्वी डीपीआरला मंजुरी दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय आमदारांची बैठक बोलाविली होती, परंतु त्या बैठकीवर विरोधी गटाच्या सातही आमदारांनी बहिष्कार घातला होता.

सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत जर म्हादईच्या विषयावर भूमिका घेतलेली जाहीर केली असेल तर आम्हाला बैठकीला कशाला बोलवायचे, असा विरोधी आमदारांचा प्रश्‍न होता.

रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचे आमदार विरेश बोरकर हे जरी विरोधी सहा आमदारांबरोबर असले तरी त्यांच्या पक्षाने रविवारी म्हादईच्या विषयावर पणजीत सभा घेतली.

विधानसभा अधिवेशनाचा पहिला दिवस राज्यपालांच्या भाषणात जाणार आहे. त्यानंतर एक दिवस म्हादईसाठी आणि उर्वरित दोन दिवसांमध्ये खासगी विधेयक सादरीकरणास, लक्षवेधी सूचना व विरोधी आमदारांचे इतर काही विषय मांडण्यासाठी वेळ मिळावा, अशी मागणी करणारे पत्र लिहिणार असल्याचे म्हटले आहे.

साखळीत ‘आरजी’ येणार?

‘आरजी’च्या वेगळ्या सभेमुळे सर्व विरोधी पक्षांमध्ये एकी नसल्याचे दिसून आले. त्यामुळे 16 तारखेला साखळीतील सभेत आरजीवाले उपस्थित राहणार की नाही, हे पहावे लागणार आहे.

परंतु काँग्रेस, तृणमूल, गोवा फॉरवर्ड यांनी सभेसाठी जोरदार तयारी केली असल्याचे दिसते. एका बाजूला लोक आता रस्त्यावर येण्यासाठी तयार होत आहेत. त्यामुळे म्हादईच्या विषयावर विधानसभा अधिवेशनात संपूर्ण एक दिवस चर्चा होणे अपेक्षित असल्याचे आलेमाव यांना वाटते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Accident: ताबा सुटला, गोव्यात पर्यटकाची कार भिंतीला - ट्रकला धडकली; झारखंडची व्यक्ती जागीच ठार; Watch Video

Ranji Trophy: विजयासाठी गोव्याला 7 विकेटची गरज! फॉलोऑननंतर चंदीगडचा चिवट प्रतिकार; अर्जुनची झुंझार फलंदाजी

Ronaldo Goa Visit: रोनाल्डो गोव्यात फुटबॉल खेळणार? प्रशासन सज्ज; 22 ऑक्टोबर रोजी होणार सामना

Mhaje Ghar: ‘माझे घर’ला का विरोध केला हे विरोधकांना विचारा! CM सावंतांचे सांगेवासीयांना आवाहन

Goa Road Repair: 'नोव्हेंबर अखेरपर्यंत गोव्यातील रस्ते उत्तम स्थितीत', मंत्री कामतांनी दिली ग्वाही; रस्ता खोदणाऱ्यांसाठी दिला इशारा

SCROLL FOR NEXT