Mahadayi River | Mahadayi Water Dispute Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Dispute: ...यासाठी कर्नाटकला वन विभागाची मंजुरी लागणारच

केंद्र सरकारने कर्नाटकला मंजुरी दिलेल्या डीपीआरसाठी पर्यावरण मंजुरीची गरज नसली तरी वन विभागाची मंजुरीची आवश्‍यकता आहे.

दैनिक गोमन्तक

Mahadayi Water Dispute: केंद्र सरकारने कर्नाटकला मंजुरी दिलेल्या डीपीआरसाठी पर्यावरण मंजुरीची गरज नसली तरी वन विभागाची मंजुरीची आवश्‍यकता आहे.

वन्यजीव संरक्षण कायद्याखाली कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्यासाठी वन मंजुरीची परवानगी सक्तीची आहे. तसे कलम 29 मध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहे, असे मत राज्याचे ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी व्यक्त केले.

कर्नाटकच्या डीपीआरला मंजुरी मिळाली आहे. मात्र कळसा-भांडुरा प्रकल्पाचे काम वन मंजुरीशिवाय करता येणार नाही. त्यांना परवानगी नको असेल तर त्यांनी केंद्र सरकारकडे या परवानगीसाठी पत्र का पाठवले?

तसेच केंद्र सरकारची दिल्लीतील पाहणी समिती गोव्यात का आली होती? असे प्रश्‍न ॲडव्होकेट जनरल पांगम यांनी उपस्‍थित केले.

एकीकडे ते म्‍हणतात परवानगीची गरज नाही तर दुसरीकडे ते केंद्राकडे अर्ज करतात, यावरून गोवा सरकारने केंद्राला पत्र पाठवल्यानंतर ते बुचकळ्यात पडले आहेत हे स्‍पष्‍ट होते, असे पांगम म्‍हणाले.

केंद्र सरकारकडून कर्नाटकला वन मंजुरीची परवानगी मिळण्याची शक्यता कमीच आहे. गोवा सरकारने केंद्राकडे हे मंजुरी देऊ नये. तसेच कर्नाटकच्या डीपीआर दिलेली मंजुरी मागे घेण्याची विनंती करावी. सर्वोच्च न्यायालयातही हस्तक्षेप अर्ज सादर करण्यात आलेला आहे, असे पांगम यांनी सांगितले.

केंद्रीय जलआयोगाने डीपीआरला मंजुरी देताना कर्नाटकला म्हादईच्या उपनद्यांमधील पाणी वळविण्याची परवानगी दिल्‍याने पर्यावरण (संरक्षण) कायदा 1986 नुसार वेगळ्या मंजुरीची गरज नाही असे कर्नाटकने केंद्राला पाठवलेल्या पत्रात म्‍हटले आहे.

बांधकामासाठी आवश्‍यक असलेला काहीसा वनक्षेत्र भाग हा पर्यावरणाचाच भाग आहे.

त्यामुळे त्याचे मंजुरी नको आहे. या प्रकल्पाचा कोणताच भाग संरक्षित किंवा पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात येत नाही.

हा प्रकल्प भीमगड वन्यजीव अभयारण्यापासून सुमारे 5-6 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे या अभयारण्यापासून एक किलोमीटर हद्दीच्या बाहेर काहीसा वनक्षेत्राचा भाग लागणार आहे.

या प्रकल्पामुळे हुबळी, धारवाड व कुंडोगळ भागात पिण्याच्या पाण्याची सोय होईल. शिवाय सुमारे 50 जणांना कायमस्वरुपी रोजगार तर 250 जणांना हंगामी रोजगार मिळणार आहे, असे केंद्र सरकारला पत्रात कळविले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: गोवा पोलिसांनी मिळवून दिला रशियन पर्यटकाचा हरवलेला पासपोर्ट

Pooja Naik Case: '..भाजप नेत्यांना केलेल्या कॉलचा संदर्भ सापडेल'; Cash For Job प्रकरणी पालेकर यांनी केली सीडीआर रिपोर्टची मागणी

Saint Francis Xavier Exposition: नोव्हेनाच्या पहिल्याच दिवशी अलोट गर्दी! जुने गोवेत 1 लाख भाविक; अजून आकडा वाढणार

Ranbir Kapoor At IFFI: 'मला चित्रपट दिग्दर्शक व्हायचंय पण..'; रणबीरने व्यक्त केली महत्वाकांक्षा; प्रेक्षकांना दिली खूशखबर

Goa Finance Scam: गोव्यात आजवरचा सर्वात मोठा आर्थिक घोटाळा; गुंतवणुकीच्या नावाखाली 50 जणांना 130 कोटींचा गंडा

SCROLL FOR NEXT