Chief Minister of Goa Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Dispute: 'भाजपच्या मुख्यमंत्र्यांकडून गोव्याचा विश्‍वासघात'

Goa: डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्या मातृभूमीचा विश्‍वासघात केल्याचा आरोप काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला आहे.

दैनिक गोमन्तक

Mahadayi Water Dispute: म्हादई प्रकरणावरून कर्नाटकातील नेते मातृभूमीशी एकनिष्ठ आहेत. तर गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्या मातृभूमीचा विश्‍वासघात केल्याचा आरोप काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला आहे.

चोडणकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले, की, कर्नाटकातील नेत्यांनी ज्याप्रकारे आपल्या मातृभूमीशी एकनिष्ठपणा दाखविला आहे, तसा एकनिष्ठपणा गोव्यातील भाजपच्या नेत्यांनी दाखवावा.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काँग्रेसवर केलेल्या आरोपाला उत्तर देताना चोडणकर म्हणाले, सावंत यांनी मागील घटना पहाव्यात.

गोव्यात काँग्रेस सरकार असताना त्यांनी कर्नाटक काँग्रेस सरकारबरोबर संघर्ष केला होता. त्याशिवाय मुख्यमंत्री सावंतच म्हादईला आपली ‘आई’ असल्याचा दावा करीत असले, तरी ते राजकीय फायद्यासाठी आईशी तडजोड करणारे आहेत, असाही आरोप त्यांनी केला आहे.

खोटे कोण बोलतो?

काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जेव्हा कळसा-भांडुरा प्रकल्प ठिकाणांचा दौरा केला, तेव्हा म्हादईचे पाणी वळविल्याचे सावंत यांच्या निदर्शनास आणून दिले होते. तेव्हा सावंत यांनी त्याचा इन्कार केला होता, याची आठवण चोडणकर यांनी करून दिली. त्यामुळे खोटे कोण बोलतो, अशा खोटारड्यांवर विश्‍वास ठेवायचा का?

अशा लोकांच्या हाती आपला गोवा सुरक्षित आहे का? असे सवाल चोडणकरांनी उपस्थित केले आहेत. अशा गंभीर विषयावर खोटारडेपणा करणाऱ्या सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही चोडणकरांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lavani Marathi Folk Art: शेतातील 'लावण' की सौंदर्याचे 'लावण्य'? मराठी मातीशी जोडलेल्या लावणीची वास्तववादी व्याख्या

Hannah Arendt On Violence: दुष्टता ही राक्षसाकडून नाही तर स्वतंत्र विचार न करणाऱ्या सामान्य माणसाकडून घडते! हॅना आरेन्ट यांचे पथदर्शी विचार

Crime News: "तू तिच्याशी का बोलतोस?" बिअर पार्टीतून सुरू झाला वाद; संतापलेल्या तरुणाने ब्लेडने सपासप वार करत मित्राला संपवलं

Verna: टेम्पोवर कोसळली वीजवाहिनी; छत्तीसगडच्या 30 वर्षीय क्लिनरचा मृत्यू

Shani Vakri 2026: शनिदेवांची उलटी चाल! 'या' राशींना बसणार मोठा आर्थिक फटका; नोकरी-व्यवसायात वाढणार मानसिक ताण

SCROLL FOR NEXT