Mahadayi Water Dispute Dainik Gomantak
गोवा

Mahadayi River: ‘कळसा-भांडुरा’चे काम त्वरित सुरू करा! बेळगावात मागणी

कर्नाटक रयत संघ आणि हसिरूसेनेची बेळगावात मागणी

दैनिक गोमन्तक

Mahadayi Water Dispute: कळसा-भांडुरा (म्हादई) प्रकल्पाचे काम त्वरित सुरू करावे, अशी मागणी कर्नाटक राज्य रयत संघ आणि हसिरूसेने संघटनेने केली. या विरोधात कर्नाटक राज्य रयत संघ आणि हसिरू सेने संघटनेतर्फे बेळगावात मागणी करण्यात आली.

त्यामुळे म्हादईवरील आगामी संकटात वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत. कदाचित अधिवेशनानंतर कळसा-भांडुरां प्रकल्पाच्या कामाला सुरूवात होण्याची शक्यता आहे.

मंगळवारी बेळगावातील कित्तूर चन्नम्मा चौकापासून हलगा-बस्तवाड येथील सुवर्ण विधानसौधकडे पायी जाऊन या ठिकाणी धरणे आंदोलन छेडण्यात येणार होते. मात्र, पोलिसांनी चन्नम्मा चौकात आंदोलन दरम्यान शेतकऱ्यांना ताब्यात घेऊन सुवर्णसौधसमोरील कोंडूस्कोप येथील आंदोलनस्थळी आंदोलन करण्याची मुभा दिली.

यावेळी सरकार राज्यातील शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी केला. राज्यात भीषण दुष्काळ असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. तरीही सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी एकही कार्यक्रम हाती घेतला नाही. त्यासह शेतकऱ्यांच्या अनेक मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे. सरकारच्या या शेतकरी धोरणाच्या निषेधार्थ धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आखला असल्याचे यावेळी संघटनेचे राज्याध्यक्ष कोडीहळी चंद्रशेखर यांनी सांगितले.

गोमंतकीय शांतच!

गेले काही महिने म्हादईबाबत राज्यात सगळीकडे शांतता आहे. सत्ताधारी आणि विरोधी नेतेसुद्धा गप्पच आहेत. यंदा पावसाळ्यात बरेच पाणी मलप्रभेत वाहून गेले, पण कोणीही दखल घेतली नाही. शिवाय म्हादईच्या नावाने जागृती करणारे, आवाज उठवणारेही गायब झाले आहेत. सभा, बैठकाही कुठे होत नाही, त्यामुळे म्हादईचा वापरही फक्त राजकारणासाठी केला जात आहे, असे पर्यावरणप्रेमीतर्फे व्यक्त होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

फुल पैसा वसूल! रोहित शेट्टी आणतोय 'Golmaal 5', गोव्यात होणार शूटिंगची सुरुवात; अजय देवगणनं दिलीये हिंट

Delhi Airport Technical Glitch: 800 फ्लाईट्सना विलंब, अनेक रद्द; दिल्ली विमानतळावर तांत्रिक अडचणीचा हजारो प्रवाशांना फटका

"तुझी मासिक पाळी संपली की सांग...": महिला क्रिकेटपटूचा सिलेक्टरवर लैंगिक अत्याचाराचा आरोप, क्रीडा विश्वात खळबळ

समुद्रकिनारी रंगला भव्य विवाह! तेजश्री प्रधानने गोव्याच्या किनाऱ्यावर केलं 'Destination Wedding' शूट

Goa Today's News Live: काणकोण बसस्थानकाजवळील रस्त्याची दुर्दशा, चालक हैराण

SCROLL FOR NEXT