Mahadayi Water Issue Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Dispute: ‘म्‍हादई’च्‍या रक्षणार्थ करो ‘या मरो’

Panjim: ‘रिव्‍हॉल्‍युशनरी गोवन्स’ने काल पणजीतील आझाद मैदानावर घेतलेल्‍या जाहीर सभेला दीड ते दोन हजार पाठीराखे उभे करण्‍यात यश मिळवले.

दैनिक गोमन्तक

Mahadayi Water Dispute: ‘म्हादई’च्या कळसा, भांडुरा या उपनद्यांचे पाणी वळविण्यासाठी केंद्रीय जल आयोगाने कर्नाटकच्‍या‘डीपीआर’ला मंजुरी देऊन आठवडा उलटला आहे. त्‍यानंतरही सरकार पक्षाकडून केवळ जनतेच्‍या डोळ्यांत धुळफेक केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर ‘रिव्‍हॉल्‍युशनरी गोवन्स’ने काल पणजीतील आझाद मैदानावर घेतलेल्‍या जाहीर सभेला दीड ते दोन हजार पाठीराखे उभे करण्‍यात यश मिळवले. यावेळी पक्षाध्‍यक्ष मनोज परब यांनी इतर सर्व राजकीय पक्षांवर सडकून टीका करत, ‘म्‍हादई’च्‍या रक्षणार्थ करो ‘या मरो’ असा नारा देत ‘टुगेटर फॉर म्हादई’ जनआंदोलनाला प्रारंभ झाल्याचे जाहीर केले.

म्हादईप्रश्‍नी गेल्‍या आठवड्यात राज्याचे जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली होती. मात्र, आजपर्यंत त्यांनी दिलेल्या निवेदनावर कोणतीही पावले उचलली गेली नाहीत.

तर तिकडे कर्नाटकात आनंदोत्सव सुरू असून या डीपीआरच्या आधारे प्रकल्पासाठी कोट्यवधींची निविदा जाहीर केली आहे. यामुळे गोमंतकीयांत तीव्र संताप निर्माण झाला आहे. त्‍याची खदखद काल ‘आरजी’च्या सभेतून बाहेर पडली.

काल झालेल्या सभेला मोठी गर्दी होती. यावेळी पक्षाचे अध्यक्ष परब यांनी सत्ताधारी भाजपसह सर्वच विरोधी पक्षांवर निशाणा साधत जहरी टीका केली. भाजप आणि काँग्रेसने म्हादई कर्नाटकाला विकल्याचा आरोप त्यांनी केला.

‘विरोधी पक्षांसोबत जाणार नाही’

भाजपसह इतर पक्ष कुचकामी आहेतच; शिवाय गोवा फॉरवर्ड दुतोंडी भूमिका बजावत आहे. यापूर्वी जलस्त्रोत खाते या पक्षाकडे असताना याबाबत त्यांनी कोणतीही हालचाल केली नाही आणि म्हादई जलविवाद लवादाचा निकाल मान्य करत हा आमचा विजय असल्याचे म्हटले.

त्यामुळे अशा प्रकारच्या विश्वासघातकी, ढोंगी, सोंग घेतलेल्या अप्रामाणिक लोकांबरोबर आपण कोणत्याही प्रकारचे एकत्रित आंदोलन करणार नाही, अशी भूमिका आरजीने काल जाहीर केली.

‘टुगेटर फॉर म्हादई’ चळवळीची स्थापना

सत्ताधारी भाजपसह मगोप, विरोधी काँग्रेस, आम आदमी पक्ष, गोवा फॉरवर्ड हे सर्वच पक्ष कर्नाटकाला म्हादई विकण्यामध्ये सहभागी आहेत, असा आरोप करत अशा राजकीय पक्षांबरोबर आपण एकत्र लढाई वा आंदोलन करू शकत नाही.

म्हणूनच आम्ही कालपासून ‘टुगेदर फॉर म्हादई’ची स्थापना करत असल्याचे ‘आरजी’चे अध्यक्ष परब यांनी जाहीर केले.

आम्ही एक वेळ उपाशी राहू; पण... : ‘भले आम्ही एक वेळ उपाशी राहू; पण म्हादईसाठी लढत राहू. ही आमची ‘करो या मरो’ची लढाई असेल. म्‍हादईप्रश्‍नी कालपासून जनआंदोलन सुरू करत असून, गावागावांत जनजागृती सभा घेतल्या जातील.

तसेच स्वाक्षरी मोहीम सुरू करत असल्याची घोषणा ‘आरजी’चे नेते मनोज परब यांनी केली. तत्पूर्वी आमदार वीरेश बोरकर आणि इतर नेत्यांनी उपस्थितांना संबोधित केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arambol: 'शेतकऱ्यांची रोजीरोटी नष्ट करून कोणता विकास करणार'? पोलिस बंदोबस्तात टॉवर उभारणी; हरमलवासीय संतप्त

Comunidade Law: कोमुनिदाद कायदा दुरुस्तीस आव्हान! स्थगितीची मागणी नाकारली; पुढील सुनावणी 13 नोव्हेंबर रोजी

Unity Mall Goa Controversy: 'पंचायत परवाना मिळेपर्यंत युनिटी मॉलचे काम नाही'! सरकारची न्‍यायालयाला हमी

Goa Jail: कैद्यांच्या जेवणावर होणार 90 ऐवजी 123 रुपये खर्च! दरवाढ लागू; पोषणमान, महागाईचा विचार करून निर्णय

Goa River Marathon: 14 डिसेंबर रोजी रंगणार 'गोवा रिव्हर मॅरेथॉन'! साडेसात हजारांहून जास्त धावपटू होणार सहभागी

SCROLL FOR NEXT