Mahadayi Water Dispute Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Dispute: म्हादई बचावासाठी ‘उटा’ सक्रिय होणार

Goa: प्रत्येक तालुक्यात जागृती सभा- गोमंंतकीयांनी संघटित होण्याची गरज

दैनिक गोमन्तक

Mahadayi Water Dispute: म्हादईचे पाणी कर्नाटक वळवू शकत नाही, आम्ही म्हादईचे पाणी कर्नाटकला वळवू देणार नाही. गोमंतकीयांनी सघटित होण्याची गरज आहे. ‘उटा’ संघटना म्हादई बचाव आंदोलनात सक्रिय सहभागी होईल, असे युनायटेड ट्रायबल्स असोसिएशन ‘उटा’ या संघटनेचे अध्यक्ष प्रकाश वेळीप यांनी फोंड्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी ‘उटा’ संघटनेचे विश्‍वास गावडे, दुर्गादास गावडे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. म्हादईचा विषय तापला आहे.

तेच आता ‘उटा’ संघटनेनेही म्हादई बचाव आंदोलनाला पाठिंबा दिल्याने या निर्णयाचे स्वागत करण्यात येत असून प्रत्येक तालुक्यात जागृती सभा घेतली जाणार आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.

प्रकाश वेळीप म्हणाले की, म्हादईच्या पाण्याचा न्यायालयीन लढा आहे. गोवा सरकारने हा विषय न्यायालयासमोर नेला असतानाही मध्येच कर्नाटक सरकार म्हादईचे पाणी वळवू शकत नाही.

म्हादईचे पाणी पळवल्यास गोव्याच्या निसर्गावर घाला घातल्यासारखे होणार असून गोव्यातील पंधरा लाख लोकसंख्येचा हा प्रश्‍न आहे.

म्हादईचा विषय धसास लावण्यासाठी आता गोमंतकीयांनी संघटीत होऊन बाहेर पडण्याची आवश्‍यकता आहे. ‘उटा’ संघटना त्यासाठी तयार आहे, असेही वेळीप म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope April 2026: 30 एप्रिलपर्यंत 'नो रिस्क'! ग्रहांची बदलली चाल, मेष राशीचं वाढलं टेन्शन; चुकीच्या निर्णयामुळे अडकू शकता संकटाच्या चक्रव्यूहात

GCA Premier League: धेंपो क्लबची अर्धी मोहीम फत्ते, 'चौगुले'विरुद्ध 646 धावांचा डोंगर; स्नेहलचे द्विशतक, जीवनचे शतक

VIDEO: वैमानिकाची एक चूक अन् 8 प्रवाशांचा खेळ खल्लास, 5 मिनिटांतच होत्याचं नव्हतं झालं; इंडोनेशियातील बोर्नियो बेटावर हेलिकॉप्टर क्रॅश

Watch Video: अय्यरच्या 'सुपरमॅन' अवतारावर रोहित-सूर्याचे विस्फारले डोळे, चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला; श्रेयसचा धडाकेबाज कॅच व्हायरल

Omkar Elephant: 'ओंकार'चा उगवे भागात धुमाकूळ, संतप्त नागरिकांकडून सरकारविरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा

SCROLL FOR NEXT