Mahadayi Water Dispute Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Dispute: '..तर राज्यातील चाळीसही आमदारांनी घरी बसावे'

म्हादई वाचली नाही, तर पूर्ण गोव्याचे अस्तित्व धोक्यात येईल अशी भीती प्रताप गावस यांनी व्यक्त केली.

दैनिक गोमन्तक

Mahadayi Water Dispute: म्हादई’ हे आमचे अस्तित्व आहे. सर्वांची आई तथा जीवनदायिनी म्हादईवर ओढवलेले संकट दूर करण्यासाठी चाळीसही आमदारांनी पुढाकार घ्यावा.

तशी इच्छा नसेल, तर नुसत्या खुर्च्या तापविण्यापेक्षा चाळीसही आमदारांनी राजीनामा देऊन घरी बसावे. असा सज्जड इशारा माजी आमदार प्रताप गावस यांनी दिला आहे. दरम्यान, साखळीतील नियोजित ‘म्हादई बचाव’ सभेला पालिकेने दिलेली परवानगी मागे घेतली आहे.

साखळी येथे आयोजित ‘म्हादई बचाव जनमत कौल’ सभेच्या पार्श्वभूमीवर जागृती करण्यासाठी आज सायंकाळी साखळी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सुनिता वेरेकर आणि मंगलदास नाईक उपस्थित होते.

पाणी ही प्रत्येक प्राणीमात्राची गरज आहे. म्हादई वाचली नाही, तर पूर्ण गोव्याचे अस्तित्व धोक्यात येईल अशी भीती प्रताप गावस यांनी व्यक्त करून जीवनदायिनी म्हादईच्या अस्तित्वासाठी जेथे ही सभा होईल तेथे लोकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन केले.

एकाएकी बदल

साखळीतील नियोजित ‘म्हादई बचाव’ सभेला पालिकेने दिलेली परवानगी मागे घेतली आहे. सोमवारी (ता. 16) साखळी येथील मैदानावर या भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला साखळी पालिकेने परवानगीही दिली होती. मात्र, आता ही परवानगी मागे घेण्यात आली आहे.

‘लोकशाहीचा खून’

ज्यांनी म्हादईचा खून केला, त्यांनीच आता लोकशाहीचाही खून केला. त्या रक्ताचे डाग मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हातावर दिसत आहेत, अशी प्रतिक्रिया विजय सरदेसाई यांनी साखळी येथील सभेला परवानगी नाकारण्याच्या निर्णयावर व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Board HSSC Result: 12 वीचा निकाल जाहीर! 92.96% विद्यार्थी उत्तीर्ण, यंदाही मुलींनीच मारली बाजी

Goa Accident: नाकेरी-बेतुल येथे भीषण अपघात; 23 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू, भटक्या गुरांचा अडथळा ठरला जीवघेणा

KKR ला दुसरा 'मोठा' झटका! हर्षित राणानंतर आता 'हा' मॅचविनर खेळाडू IPL 2026 मधून बाहेर

Viral Video: 'डायपर'चा असाही वापर! कोल्ड-ड्रिंक थंड ठेवण्यासाठी तरुणाचा 'देसी जुगाड', पाहा कसं बनवलं घरगुती मिनी फ्रीज

पदार्पण असावं तर असं! 15 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय टी-20 पदार्पणातच झळकावलं शतक, रचले दोन विश्वविक्रम Watch Video

SCROLL FOR NEXT