Mahadayi water dispute  Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Dispute: काँग्रेस पुन्हा करणार ‘म्हादई जागोर’

डीपीआरला मंजुरी देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला विरोध करण्यास काँग्रेस आघाडीवर राहील. त्याशिवाय राज्यभर ‘म्हादई जागोर' ही जागृती मोहीम पुन्हा राबवेल, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी सांगितले.

दैनिक गोमन्तक

Mahadayi Water Dispute: म्हादई वाचविण्यासाठी काँग्रेस सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. कर्नाटक सरकारच्या कळसा-भांडुरा प्रकल्पाच्या डिटेल्स प्रोजेक्ट रिपोर्टला (डीपीआर) विरोध करण्यासाठी काँग्रेस आघाडीवर राहील, असे सांगत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी म्हादईच्या विषयावर राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी केली. त्याचबरोबर यापूर्वी म्हादई वाचविण्यासाठी सुरू केलेली ‘म्हादई जागोर'' हे आंदोलन राबविले जाईल, असे सांगितले.

काँग्रेस भवनातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी ॲड. रमाकांत खलप, विजय भिके, तुलियो डिसोझा, अमरनाथ पणजीकर यांची उपस्थिती होती. तत्पूर्वी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली, त्या बैठकीत काही ठराव मंजूर झाले. त्याविषयी पाटकर यांनी माहिती दिली.

पाटकर म्हणाले, लोकभावनेचा आदर केला आहे, त्याशिवाय काही धोरणात्मक निर्णय लोकांच्या आकांक्षा व भावना पाहून मागेही घेतले आहेत. राज्याची जीवनदायीनी असलेल्या म्हादईचे अस्तित्व टिकविणे महत्त्वाचे आहे. कारण त्यावर पर्यावरण, वन्यजीव आणि लोकांची उपजिविका टिकून आहे. केंद्रात काँग्रेस सरकार असताना म्हादईच्या विषयावर म्हादई जल तंटा लवादाची स्थापना केली. दिल्लीत जंतरमंतरवरही काँग्रेसने तेव्हा निदर्शने केली होती.

डीपीआरला मंजुरी देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला विरोध करण्यास काँग्रेस आघाडीवर राहील. त्याशिवाय राज्यभर ‘म्हादई जागोर' ही जागृती मोहीम पुन्हा राबवेल. म्हादईच्या रक्षणासाठी ज्या संघटना, गट, व्यक्ती प्रयत्न करतील, त्यास पक्ष पाठिंबा देईल. भाजपने चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवावे. म्हादईच्या प्रकरणावर राज्य सरकारने श्‍वेतपत्रिका काढावी, अशी आमची प्रमुख मागणी आहे. राज्यभर जागृती करण्यासाठी पक्षाने समितीही स्थापन केली आहे, असे पाटकर यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ISL 2026: 'एफसी गोवा'चा धडाका, दोन गोलने विजय; मुंबई सिटीची अपराजित दौड खंडित

Horoscope: मेहनतीला मिळणार यशाची सुवर्ण जोड! 'गजकेसरी' योगामुळे 5 राशींच्या आयुष्यात येणार सुखाचे दिवस, संपत्तीत होणार अपार वाढ

GCA Premier League: 'धेंपो' गोव्यातील 'चॅम्पियन' क्रिकेट क्लब, 'चौगुले'विरुद्धच्या अंतिम लढतीत पहिल्या डावातील आघाडीवर बाजी

VIDEO: LIVE मॅचमध्ये हायव्होल्टेज ड्रामा!निमंत्रण न मिळाल्याने संतापला तरुण, थेट खेळपट्टीवरच ट्रॅक्टर फिरवला; पाहा व्हिडिओ

Margao Muncipal: नगरपालिका उद्यानात 'कॅफेटेरिया'चा प्रस्ताव मंत्री दिगंबर कामत यांनीच दिला! प्रभव नायक यांचा आरोप

SCROLL FOR NEXT