Mahadayi Water Dispute Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Dispute: म्हादईसाठी आमरण उपोषण करणार

म्हादई संदर्भात सरकार निद्रिस्त भूमिका घेत राहिला तर आझाद मैदानावर आमरण उपोषण बसण्याचा इशारा लोककलाकार कांता गावडे यांनी सरकारला दिला आहे.

दैनिक गोमन्तक

Mahadayi Water Dispute: म्हादई बाचावासाठी गोमंतकीयांनी जागे होण्याची आवश्‍यकता आहे. म्हादई संदर्भात सरकार निद्रिस्त भूमिका घेत राहिला तर आझाद मैदानावर आमरण उपोषण बसण्याचा इशारा लोककलाकार कांता गावडे यांनी सरकारला दिला आहे.

कांता गावडे यांच्यासोबत दोन अन्य साहित्यिकांनी सुद्धा त्यांच्याबरोबर उपोषणास बसण्याची तयारी दाखवली आहे.

वेलिंग येथे शालीनी सपन या वास्तूत रविवारी राजकीय पक्षविरहित गोव्यातील लेखक तसेच साहित्यिक, कलाकार व इतर बुद्धिजीवींची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कलाकार कांता गावडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला ‘गोमन्तक’चे संपादक-संचालक राजू नायक, रामकृष्ण जल्मी, प्रकाश नाईक, एन. शिवदास, दिलीप बोरकर, नोनू नाईक, अजय बुवा व इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती.

कांता गावडे म्हणाले, म्हादई ही गोव्याची जीवनदायिनी आहे, पण कर्नाटकने म्हादई पळवण्याचा घाट घालून गोमंतकीयांच्या तोंडचे पाणीच पळवले आहे. हा प्रकार हाणून पाडण्याची गरज असून त्यासाठी सर्वांनी संघटित व्हायला हवे.

सरकार या विषयावर काय करील माहीत नाही, तरीपण सरकारकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यास म्हादईसाठी आमरण उपोषणाबरोबरच करावेच लागले. म्हादई बचावासाठी गोमंतकीयांनी एकत्र येणे गरजेचे आहे.

यावेळी मेळावलीचे आंदोलनकर्ते शशिकांत मेळेकर, तृणमूल काँग्रेसच्या अविता बांदोडकर, साहित्यिक अँथोनी वाज, अजय बुवा यांनीसुद्धा यावेळी आंदोलनासंदर्भात मार्गदर्शन केले.

कर्नाटककडून म्हादईचे ‘हरण’

  • कर्नाटकने म्हादईचे ‘हरण’ केले असून कर्नाटकातील सरकार हे स्वार्थी वृत्तीचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. कर्नाटकातील नद्या, नाले सरकारने मोठ्या प्रकल्पांच्या बांधकामासाठी नष्ट करून टाकले आहेत.

    त्यामुळे बंगलोरसारख्या शहरात महापूर आला. नदी नाले नष्ट करण्याच्या प्रवृत्तीमुळेच महापुराचा धोका कर्नाटकातील विविध भागात आला. त्यावर उतारा म्हणून आता म्हादईचे पाणी पळवले जात आहे, असे मत राजू नायक यांनी व्यक्त केले.

  • लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी आणि आगामी विधानसभा निवडणूक नजरेसमोर ठेवूनच ही कृती केली जात आहे.

    भाजप आमदार या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता दुरावली असल्याने आता लोकांनीच म्हादईसाठी आंदोलन करून गोव्याची जीवनदायिनी म्हादई वाचवली पाहिजे.

  • गोव्याला अनेक समस्या भेडसावत आहेत. खनिज खाणीतून जो भ्रष्टाचार झाला, तो सर्वश्रूत आहे. त्यामुळे केवळ पैशांसाठी काहीही असे गोव्यात घडत आहे.

    राज्यात कणाहीन सरकारमुळेच असा प्रत्यय प्रत्येक ठिकाणी येत असल्याचे सांगून गोवा वाचवण्यासाठी, म्हादई जिवंत ठेवण्यासाठी सामाजिक चळवळ उभारावी लागेल. त्यासाठी सर्वांनी संघटित लढा द्यावा, असे आवाहनही राजू नायक यांनी केले.

माशेलात 11 रोजी बैठक : म्हादई बचावची पुढील बैठक माशेलात येत्या 11 रोजी संध्याकाळी 4 वाजता होणार आहे. या बैठकीला अंत्रुज महालाबरोबरच इतर सर्व संबंधितांनी सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

राजकारण बाजूला सारून एकवटूया आणि ‘म्हादई वाचवुया’ अशी हाक या बैठकीतून देण्यात आली. सदर सभेत साहित्यिक, बुद्धिवादी व विचारवंत यांच्याबरोबर पर्यावरणवादी राजेंद्र केरकर मार्गदर्शन करणार आहेत

पूर्वीचा काळ आणि आताचा काळ यात जमीन अस्मानाचा फरक आहे. यापूर्वी विद्यार्थी चळवळीतून अनेक समस्या मार्गी लागल्या. पण आज राजकारण्यांनी लोकांत भय निर्माण करून ठेवले आहे. युवा वर्ग नोकरीसाठी राजकारण्यांच्या मागे आहे.

महिलांना मिळणारे दीड दोन हजार बंद होतील, म्हणून कोणी आवाज काढत नाहीत, युवकांत भोगवादी वृत्ती बळावत असून युवा वर्गाला म्हादईच्या चळवळीत सामील करून घेण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, असे सांगताना विरोधी पक्ष गलितगात्र झाल्याने आता लोकांनीच सक्रिय व्हायला हवे.- दिलीप बोरकर, साहित्यिक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'मी चाललोय, काहीतरी रंजक घडेल!',आरजीच्या पाठोपाठ पालेकरांची दिल्लीवारी; Watch Video

अग्रलेख: '...आंबेडकरांच्या 'संघराज्या'च्या व्याख्येने गोव्याला दिली वेगळी ओळख!

Goa Politics: 'पक्षात यायचं तर दरवाजे उघडे आहेत', भाजप प्रदेशाध्यक्षांनी उडवली खिल्ली; काँग्रेसच्या रणनीतीला दिलं झणझणीत उत्तर

IND vs SA: कसोटी मालिकेत टीम इंडियाचा सूपडा साफ! व्हाईटवॉशनंतर गौतम गंभीरला म्हणाला, 'पराभवाची जबाबदारी सगळ्यांची...'

WTC Points Table: भारताच्या 'क्लिन स्वीप'चा पाकिस्तानला फायदा, WTC पॉइंट टेबलमध्ये उलटफेर; दक्षिण आफ्रिकेने मारली बाजी

SCROLL FOR NEXT