Mahadayi River |Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa News: ‘म्हादई’ वाचविण्यासाठी उठा गोवेकरांनो, जागे व्हा!

विद्यार्थिनीने शाळेतील कार्यक्रमात ‘गोंयकारांनो जागे जायात'' यावर ‘म्हादई’ बनून म्हादईविषयी ‘उठा जागे व्हा‘ अशी आर्त हाक दिली आहे. तिचा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर खूप व्हायरल झाला आहे.

दैनिक गोमन्तक

Goa News: साखळीच्या सेंट जॉन ऑफ दी क्रॉस हायस्कूलच्या आवृत्ती देसाई या विद्यार्थिनीने शाळेतील कार्यक्रमात ‘गोंयकारांनो जागे जायात'' यावर ‘म्हादई’ बनून संपूर्ण जनतेला म्हादईविषयी ‘उठा जागे व्हा‘ अशी आर्त हाक दिली आहे. तिच्या या सादरीकरणाचा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे.

विशेष बाब म्हणजे या तिच्या व्हिडिओवर राजकारण्यांविरोधात टीका करणाऱ्या प्रतिक्रिया व्यक्त होत होताना दिसत आहेत.

आवृत्ती देसाईने शाळेत सादर केलेले ‘म्हादई’ हे एक पात्री सादरीकरणातून जे भाष्य केले आहे, ते खरोखर डोळे उघडणारे आहे. ‘गोंयकारांना जागे जायात'', मी पुन्हा घरात कधीच येणार नाही, त्यामुळे तुम्ही जागे व्हायला पाहिजे, अशी जी काही विनवणी केली आहे, ती खरोखर काळजाला भिडणारी आहे. ‘म्हादई‘’तुमची आई आहे, माझ्या जाण्याची वेळ झाली आणि तुम्ही आता पाणी पाणी म्हणत बसा, असे म्हादई सांगत आहे.

आवृत्तीने हे भाष्य कोकणीतून केले आहे. राज्यातील जनतेला आता झोपू नका, जागे व्हा. कर्नाटकाने फास आवळला आहे. त्यामुळे आता तरी तुम्ही यातून धडा घ्या, जागे होऊन उठा आणि मला वाचविण्यासाठी पुढे या, असे ‘म्हादई’ जनतेला हाक देत आहे.

समाजमाध्यमांत राजकारण्यांवर टीकास्त्र समाजमाध्यमांतून आवृत्तीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिच्या या सादरीकरणाचे तर कौतुक झालेलेच आहे. राजकारण्यांवर नेटकऱ्यांनी टीका करण्याची संधी सोडलेली नाही.

सत्ताधाऱ्यांविरोधात वातावरण निर्माण झाले आहे. त्याची चीडही आता या व्हिडिओवरील प्रतिक्रियेतून लोक व्यक्त करीत आहेत. टोमणा मारणाऱ्या प्रतिक्रियाही पसंत पडत असल्याने त्यांना ते ‘लाईक'' करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: धारबांदोडा, वाळपई, सांगेत पावसाची नव्‍वदी पार; सरासरीतील तूट अजूनही 30 टक्‍क्‍यांपेक्षा अधिकच

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! महागाई भत्त्यात 2 टक्क्यांची वाढ, थकबाकीची रक्कमही मिळणार

Trigrahi Yog 2026: 22 ऑगस्टला बनतोय सर्वात शक्तिशाली 'त्रिग्रही योग'! 4 राशींच्या पदरात पडणार श्रीमंती अन् यश; भाग्योदयाचे दिवस सुरु होणार

Margao Police Station: झुरळे-डासांनीच सरकारला जाग! पोलिस ठाण्याच्या स्थितीवर प्रभव यांची सडकून टीका

Knife Attack: फुटबॉल सामन्यातील वादातून दोघांवर हल्ला, जुने गोवे पोलिसांकडून चौघांवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT