Mahadayi River | Save Mahadayi Dainik Gomantak
गोवा

Mahadayi River: ‘सेव्ह म्हादई’ची सभा होणारच; आंदोलकांचा ठाम निर्धार

आमचा लढा हा म्हादईसाठी आहे. आम्ही राजकारण करण्यासाठी ही लढाई लढत नाही, असा हल्लाबोल सेव्ह म्हादई मंचचे सदस्य हृदयनाथ शिरोडकर यांनी केला.

दैनिक गोमन्तक

Mahadayi Water Dispute: ‘सेव्ह म्हादई’ या झेंड्याखाली साखळीत जी सभा घेतली जाणार आहे, ती होणारच. आम्ही सभा रद्द केलेली नाही. केवळ नगरपालिकेने परवानगी नाकारली आहे.

आमचा लढा हा म्हादईसाठी आहे. आम्ही राजकारण करण्यासाठी ही लढाई लढत नाही, असा हल्लाबोल सेव्ह म्हादई मंचचे सदस्य हृदयनाथ शिरोडकर यांनी केला.

शिरोडकर म्हणाले की, कर्नाटकविरोधात हा संघर्ष सुरू आहे. खरे तर या विषयात आम्हाला राज्य सरकारनेच पाठिंबा द्यायला हवा होता. दिल्लीवरून अमित शहा यांची भेट घेऊन आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पहिले काम सभा रद्द करण्याचे केले. (Save Mahadayi)

त्याला त्यांनी प्राधान्य दिल्याचे स्पष्ट दिसते. 9जानेवारी रोजी आम्ही साखळी पालिकेकडे परवानगी मागितली. तीन दिवसानंतर आम्हाला परवानगी मिळाली आणि पंधराच मिनिटांत ही परवानगी मागे घेतली, यावरून सरकारचे धोरण काय ते स्पष्ट होते, असे शिरोडकर म्हणाले.

म्हादई वाचविण्यासाठी साखळीत सर्व राजकीय पक्षांसह संघटनांची संयुक्त सभा सोमवारी आयोजिली होती. त्या सभेला साखळी पालिकेने परवानगी दिली आणि लगेच मागेही घेतली. या सरकारने लोकशाहीचा खून केला आहे. हे सरकार आंदोलकांना घाबरले आहे. - ॲड.अमित पालेकर, प्रदेशाध्यक्ष, आप.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Nestle Case: नेस्लेला मोठा दिलासा! 300 कोटींच्या तक्रारीवर पडदा; "मॅगी सॉस घोटाळा" CCI ने फेटाळला

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या कारखाली पोलिस कॉन्स्टेबल चिरडला? भाजपने शेअर केला व्हिडिओ Watch

Goa Crime: गोवा कॅसिनोचा नाद नडला! जुगार खेळण्यासाठी लुटले 30 लाख; दिल्लीत सोनारासह चौघे जेरबंद

गोव्यात घुमल्या पॅलेस्टाईन जिंदाबादच्या घोषणा; पणजी चर्च समोर इस्त्राईल विरोधात निदर्शने करणाऱ्यांना पोलिसानी घेतले ताब्यात

Mapus Theft: दोनापावला, म्हापसा येथील दरोड्यांचा धागा एकच? सराईत टोळीचा संशय; पोलिस यंत्रणेवर प्रचंड दबाव

SCROLL FOR NEXT