Mahadayi River| Dainik Gomantak
गोवा

Mahadayi River: घरोघरी लागणार पणत्या; म्हादईप्रश्नी सरकारला जागे करण्यासाठी अनोखा उपक्रम

म्हादई रक्षणाबाबत निद्रिस्त गोवा सरकारला जागे करण्यासाठी गोमंतकीयाने आपल्या घरासमोर मेणबत्ती/पणती पेटवावी, असे आवाहन म्हादई बचाव मंचच्या सासष्टी विभागाने काल केले.

दैनिक गोमन्तक

Mahadayi River: म्हादई रक्षणाबाबत गोवा सरकार पूर्णपणे झोपलेले असून या निद्रिस्त सरकारला जागे करण्यासाठी रविवारी 12 तारखेला प्रत्येक गोमंतकीयाने आपल्या घरासमोर मेणबत्ती किंवा पणती पेटवावी, असे आवाहन म्हादई बचाव मंचच्या सासष्टी विभागाने काल केले.

सासष्टी विभागाचे निमंत्रक सेराफिन कोता यांनी रविवारी सायंकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान ही मेणबत्ती किंवा पणती पेटवावी जेणेकरून कदाचित या निद्रिस्त सरकारला जाग येऊ शकते. या निषेधाचे फोटो फेसबूक आणि इस्ट्राग्रामवरून शेअर करा, असे आवाहन केले.

यावेळी तारा केरकर, प्रतिमा कुतिन्हो, अँथनी डिसिल्वा, फ्रेडी त्रावासो, प्रशांत नाईक, ओलेंसियो सिमोईस, दुर्गादास कामत व अन्य आंदोलक उपस्थित होते.

हे आंदोलन आता सासष्टी तालुक्यात नेले जाणार असल्याचे सूतोवाच यावेळी कोता यांनी केले. म्हादई आटली तर त्याचे दुष्परिणाम दक्षिण गोव्यावरही होणार आहेत.

त्यामुळे दूधसागरही आटणार याची कल्पना लोकांना करून देण्यासाठी सासष्टी तालुक्यातील प्रत्येक गावात सभा आयोजित केल्या जाणार असून त्याद्वारे व्यापक जागृती करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जोपर्यंत कर्नाटकचा डीपीआर मागे घेतला जात नाही तोपर्यंत आमचे आंदोलन चालूच राहणार असे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: ''...तर आज इस्रायलचे अस्तित्वच नसते'' लेबनॉनमधील कारवाईवरुन ट्रम्प यांचे खळबळजनक वक्तव्य; नेतन्याहूंच्या युद्धनीतीवर सवाल

FIFA World Cup 2026: उरुग्वेकडून खेळतोय 'गोव्या'शी नातं असलेला खेळाडू; सौदी अरेबियाविरुद्ध केला निर्णायक गोल, कोण आहे Maximiliano Araujo?

Goa Village News: उसगाव-गांजेतील घरपट्टी शुल्कात होणार कपात; विशेष ग्रामसभेत ठराव संमत, गरिबांना होणार लाभ

Mayem Kayaking Service: मये तलावात 'कायाकिंग' बोटिंग सेवा सुरू

Emergency Health Services: आपत्कालीन आरोग्य सेवा होणार अधिक सक्षम; 24 तास नियंत्रण कक्ष उभारण्याचा प्रस्ताव, 108 सेवेचा सखोल आढावा

SCROLL FOR NEXT