Mavin Gudinho  Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Dispute : म्हादई गोव्याची आहे आणि ती कोणीही वळवू शकत नाही; गुदिन्हो यांचा कर्नाटकवर निशाणा

म्हादईच्या लढाईत आम्ही सर्व कायदेशीर, तांत्रिक आणि राजकीय पर्याय शोधू असे प्रतिपादन पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी केले.

दैनिक गोमन्तक

Mahadayi Water Dispute : गेल्या काही दिवसांपासून म्हादईवरुन गोव्यात राजकारण चांगलेच तापले आहे. म्हादई आमची आई आहे. कोणत्याही स्थितीत म्हादई आम्ही जिंकणारच. कर्नाटकला म्हादईचे पाणी वळवणे शक्य होणार नाही. म्हादईचा लढा आम्ही जिंकणार. आम्ही आमचा गोवा सांभाळणार. म्हादईच्या लढाईत आम्ही सर्व कायदेशीर, तांत्रिक आणि राजकीय पर्याय शोधू असे प्रतिपादन पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी केले.

मुरगाव उपजिल्हाधिकारी कार्यालयातर्फे टिळक मैदानावर आयोजित 74व्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात मंत्री गुदिन्हो प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. पुढे ते म्हणाले कि, कर्नाटकात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे तेथील नेते मतदारांना आकर्षित करण्यासाठी म्हादईच्या बाजूने वाटेल बोलून त्यांची मनधारणी करण्याचे प्रयत्न करत आहेत. ते लोकांना फुकटची आश्वासने देत आहेत.

म्हादई गोव्याची आहे आणि ती कोणी वळवू शकत नाही. ती गोव्याशिवाय कुणाला मिळणार नाही. ती आमची आई आहे असे रोखठोक खडेबोल गुदिन्हाे यांनी कर्नाटकला सुनावले. विरोधक नाहक सरकार विरोधात टोलेबाजी करतात ती थांबवावी. आम्ही म्हादई आमच्या हातातून जायला देणार नाही असे पुन्हा एकदा त्यांनी ठणकावून सांगितले. म्हादई नदीचे पाणी वळवण्याचा प्रयत्न करून कर्नाटकने गोव्याशी असलेले सौहार्दपूर्ण संबंध बिघडू नयेत. सर्वोच्च न्यायालय बचावासाठी पुढे आल्याने आणि मोठे राज्य असल्याने कर्नाटकला मदत होणार नाही.

राज्यात अपघातात मृत्यू आलेल्याच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपये वित्तीय साहाय्य देण्याची योजना राज्य सरकारकडून मार्गी लावली जाईल, अशी माहिती मंत्री माविन गुदिन्हो यांनी दिली.सदर योजना यापूर्वीही राज्यात सुरू होती, पण आता ती नव्याने मार्गी लावणार आहे. यापूर्वी ज्या अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांनी सदर योजनेसाठी अर्ज केले होते, त्या सर्वांना ही योजना मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना थोडा तरी दिलासा मिळेल मंत्री माविन गुदिन्हो यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: धारदार शस्त्राने वडिलांचा जीव घेणारा प्रमोद 'मानसिक रुग्ण'; बहिणीचा पोलिसांसमोर खुलासा

Rashi Bhavishya 15 November 2024: आरोग्यात सुधारणा होईल, नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी प्रगती कराल; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Goa Electricity: फाईव्ह स्टार एसी, Led दिवे; वीज बचतीबाबत सरकारी कार्यालयांसाठी नवी नियमावली

Cash For Job Scam: मंत्र्यांच्‍या कार्यालयांशी जवळीक, म्हणून अनेकजण भुलले 'श्रुतीला'; कष्टाची कमाई गमावली !

हायकोर्टाने तयार केलेल्या सेवाशर्तीच्या नियमात बदल; गोवा सरकारचा बचाव करणाऱ्या मुख्य सचिवांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

SCROLL FOR NEXT