Rush of passengers to board a train for the Maha Kumbh Mela 2025 ANI Photo
गोवा

Maha Kumbh Mela 2025: महाकुंंभसाठी गोवा सरकार सोडणार Special Train; तारीख, वेळ जाणून घ्या, तिकीट कसे मिळणार?

Goa Government Maha Kumbh Mela Special Train: मडगावहून प्रयागराजला जाण्यासाठी तीन रेल्वेट्रेन सोडणार असल्याची घोषणा गोवा सरकारने केली आहे.

Akshata Chhatre

Goa to Prayagraj Special Train Timing

मडगाव : उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या महाकुंभ मेळ्यात जगभरातून भाविक पोहोचले असून गोवेकरांनही या कुंभमेळ्यात सहभागी होता यावे यासाठी गोवा सरकारने विशेष रेल्वेसेवेची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवदर्शन यात्रा या योजनेअंतर्गत ही घोषणा करण्यात आली असून समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई मडगावहून प्रयागराजला जाण्यासाठी तीन रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकाची माहिती माध्यमांना दिली.

मडगाव ते प्रयागराज रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक (Madgaon To Prayagraj Train Timing)

  1. पहिली ट्रेन

    6 फेब्रुवारी : मडगाववरून सकाळी 8 वाजता सुटणार

    10 फेब्रुवारी : प्रयागराजवरून संध्याकाळी 4:30 वाजता सुटणार

  2. दुसरी ट्रेन

    13 फेब्रुवारी : मडगाववरून संध्याकाळी 4:40 वाजता सुटणार

    18 फेब्रुवारी : प्रयागराजवरून सकाळी 11:50 वाजता सुटणार

  3. तिसरी ट्रेन

    21 फेब्रुवारी : मडगाववरून रात्री 7:40 वाजता सुटणार

    26 फेब्रुवारी : प्रयागराजवरून सकाळी 10.30 वाजता सुटणार

    या ट्रेनला थिवी आणि करमाळी अशा दोन ठिकाणी थांबा आहे.

मडगावरवरून सुटणाऱ्या ट्रेन किती तासांनी प्रयागराजला पोहोचतील?

गोवा ते प्रयागराज हा ट्रेन प्रवास साधारण ३४ तासांचा असेल, अशी माहिती सरकारच्यावतीने देण्यात आली.

गोवा सरकारच्या रेल्वेगाड्यांसाठी तिकीटाचे पैसे भरावे लागतील का?

गोव्याहून प्रयागराजला जाणाऱ्या या रेल्वेगाड्या प्रयागराजच्या अलीकडच्या स्थानकावर थांबतील. तिथून पुढे प्रयागराजपर्यंतचा प्रवास प्रवाशांना स्वतःच्या खर्चाने करावा लागेल. मडगाव ते प्रयागराजच्या अलीकडील स्थानकापर्यंत प्रवाशांची जबाबदारी गोवा सरकारची असेल. त्यापुढील प्रवास आणि राहण्याचा- खाण्याचा खर्च भाविकांना स्वत: करावा लागेल.

गोवा सरकारच्या महाकुंभ विशेष ट्रेनसाठी बुकिंग कशी करता येईल? Madgaon to Prayagraj Mahakumbh Special train how to book ticket

भाविकांनी 0832-2232257 या क्रमांकारावर संपर्क साधावा. प्रथम येणाऱ्या प्राधान्य या निकषानुसार भाविकांना ट्रेनचे तिकीट मिळेल, अशी माहिती सरकारने दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT