Maha Kumbh Mela 2025: अ‍ॅम्बेसेडर बाबा ते आयआयटी बाबांपर्यंत...महाकुंभ मेळाव्यातील 'या' 5 बाबांची होतेय सर्वाधिक चर्चा

Prayagraj Maha Kumbh 2025: उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे आजपासून महाकुंभमेळा सुरू झाला आहे. या महाकुंभात देशाच्या कानाकोपऱ्यातून आणि परदेशातून साधू आणि संत आले आहेत.
Mahakumbh 2025
Mahakumbh 2025Dainik Gomantak
Published on
Mahakumbh 2025
Mahakumbh 2025Dainik Gomantak

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभमेळा सुरू झाला आहे. या महाकुंभात देशाच्या कानाकोपऱ्यातून आणि परदेशातून साधू आणि संत आले आहेत. महाकुंभमेळ्यात असे अनेक बाबा आले आहेत, जे भक्तांचे लक्ष वेधून घेत आहेत.

Mahakumbh 2025
Mahakumbh 2025Dainik Gomantak

आयआयटी बाबा

आयआयटी बाबा सध्या सर्वाधीक चर्चेत आहेत. त्यांच्या चर्चेमागे एक विशेष कारण आहे. या बाबांनी अभियांत्रिकी ते निवृत्तीपर्यंतचा प्रवास केला आहे. बाबा आयआयटी मुंबईचे पदवीधर आहेत. आयआयटी मुंबईमधून एरोस्पेस आणि एरोनॉटिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतल्यानंतर या बाबांनी सन्यास घेतला.

Mahakumbh 2025
Mahakumbh 2025Dainik Gomantak

राधे पुरी बाबा

मध्य प्रदेशातील उज्जैन येथून हे बाबा प्रयागराजला आले आहेत. ते त्यांच्या कठोर तपश्चर्येमुळे धार्मिक आकर्षणाचे केंद्र बनले आहे. राधे पुरी बाबा २०११ पासून जगाच्या कल्याणासाठी आपला उजवा हात वर करून राहत आहेत. बाबांच्या या तपश्चर्येला हठयोग म्हणतात.

Mahakumbh 2025
Mahakumbh 2025Dainik Gomantak

कबुतर बाबा

राजस्थानच्या चित्तौडगड येथून हे बाबा प्रयागराजला पोहोचले आहेत. गेली अनेक वर्षे ते डोक्यावर कबुतर घेऊन फिरत आहेत. एका कबुतराने तर 9 वर्षांपासून त्यांच्या डोक्यावर तळ ठोकला असं सांगितलं जातं. बाबांचे हे अनोखे रूप सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

Mahakumbh 2025
Mahakumbh 2025Dainik Gomantak

अ‍ॅम्बेसेडर बाबा

या बाबांना राजदूत नागा बाबा म्हणून ओळखले जाते. बाबांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्याकडे असलेली १९७३ ची जुनी भगव्या रंगाची अ‍ॅम्बेसेडर कार आहे, जी अगदी व्यवस्थित चालू स्थितीत आहे. बाबा जिथे जातात तिथे ते आपली कार घेऊन जातात.

Mahakumbh 2025
Mahakumbh 2025Dainik Gomantak

अनाज वाले बाबा

यूपीच्या सोनभद्र जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या अमरजीत बाबांनी आपल्या डोक्यावर गहू, बाजरी, हरभरा आणि वाटाणा पिकवला आहे. हे साधू बाबा हठ योगाचा सराव करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. पर्यावरण जागृतीचा संदेश देण्यासाठी ते त्यांच्या डोक्यावरच पिके उगवतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com