
भारतातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा हा 'महाकुंभमेळा' मानला जातो. या मेळाव्याला देशातील तसेच परदेशातील करोडो लोक सहभागी होतात. यावर्षी २०२५ मध्ये प्रयागराज येथे महाकुंभमेळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आलीय.
दरम्यान, ब्रिटीश इतिहासकार निक बुकर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. त्यांनी आपल्या कुटूंबियांसोबत गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर महाकुंभमेळ्याचं वाळूशिल्प रचलं आहे. तसंच व्हिडिओमध्ये ते प्रयागराजमधील महाकुंभमेळाव्याचं महत्त्व स्पष्ट करताना दिसत आहे.
'brain._.buzz' या इंस्टाग्रामवर हँडलवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला 1 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळालेले आहेत. व्हिडिओमध्ये निक बुकर प्रयागराजला भेट देणार असल्याचेही सांगत आहेत.
नेटिझन्सकडून कौतुक
निक बुकर यांचा हा व्हिडिओ पाहून नेटिझन्स आश्चर्यचकित झाले, असून ते त्यांचं कमेंट करून कौतुक करत आहेत. कमेंट सेक्शनमध्ये एका वापरकर्त्याने लिहिले, “महाकुंभमेळाव्याबद्दल निक बुकर यांना भारतीयांपेक्षा जास्त माहिती आहे. तर दुसऱ्या वापरकर्त्याने, निक बुकर यांनी महाकुंभमेळाव्याबाबत योग्य माहिती दिल्याचं म्हटलं आहे.
प्रयागराज महाकुंभमेळ्याचे महत्त्व
प्रयागराज हे गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वती या तीन नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. या संगमाला त्रिवेणी संगम म्हणतात. अशी श्रद्धा आहे की या संगमात स्नान केल्याने सर्व पाप क्षालून जातात आणि मोक्ष प्राप्तीचा मार्ग सुकर होतो.
महाकुंभमेळ्याच्या तारखा ग्रहांच्या विशिष्ट स्थितीनुसार ठरवल्या जातात. प्रत्येक कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी केंद्र आणि राज्य सरकार मोठ्या प्रमाणावर तयारी करतात, ज्यामध्ये रहदारी, स्वच्छता, सुरक्षा, आणि राहण्याच्या सोयींची व्यवस्था केली जाते.
महाकुंभमेळ्याची वैशिष्ट्ये
संगमात स्नान केल्याने पापांचा नाश होतो आणि मोक्षप्राप्ती होते, अशी श्रद्धा आहे. शाही स्नानाला विशेष महत्त्व आहे, ज्यामध्ये नागा साधूंचा सहभाग प्रमुख आकर्षण असतो. महाकुंभमेळ्यात संत, महंत, आणि नागा साधू सहभागी होतात. ते अध्यात्म, योग, आणि ध्यान याबाबत प्रवचन देतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.