Shigmotsav in Goa 2023 Dainik Gomantak
गोवा

Ponda Shigmotsav 2023: फोंड्यातील शिगमोत्सवात मडकईचा डंका!

चित्ररथामध्ये बांदोडा येथील महालक्ष्मी नागरिक समिती प्रथम

गोमन्तक डिजिटल टीम

Ponda Shigmotsav 2023 फोंडा तालुका अंत्रुज शिगमोत्सव समितीतर्फे आयोजिलेला यंदाचा शिगमोत्सव यशस्वी ठरला.

या शिगमोत्सवात चित्ररथ स्पर्धेत महालक्ष्मी नागरिक समिती, बांदोडाला प्रथम तर रोमटामेळमध्ये सुयोग शिमगोत्सव मंडळ, आडपईला पहिला पुरस्कार प्राप्त झाला. शिगमोत्सव राज्य सरकारच्या पर्यटन खात्याच्या सहकार्याने आयोजिला होता.

यावेळी फोंडा तालुक्यातील एकूण वीस ज्येष्ठ शिगमो कलाकारांचा सत्कार करण्यात आला. हा सत्कार कृषीमंत्री रवी नाईक, कला संस्कृतीमंत्री गोविंद गावडे तसेच राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, माजी खासदार नरेंद्र सावईकर, इतर मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष मनोहर आडपईकर तसेच फोंडा नगराध्यक्ष रितेश नाईक व इतरांच्या हस्ते करण्यात आला.

शिगमोत्सवातील विविध स्पर्धांचा निकाल पुढीलप्रमाणे

चित्ररथ स्पर्धा: त्रिवेणी कला संघ, फोंडा (द्वितीय), कुंभारजुवा नागरिक समिती, कुंभारजुवे (तृतीय) तर उत्तेजनार्थ बक्षिसे गजानन क्रिएटिव्ह बॉयज, आडपई युवक संघ, बाल गोपाळ कला मंडळ चिंबल, धाडसकल स्टार्स माशेल व शांतादुर्गा म्हारुदेव प्रतिष्ठान कवळे यांना जाहीर झाली.

रोमटामेळ स्पर्धा: मंडलेश्‍वर माणागुरु शिगमोत्सव मंडळ, शिरोडा (द्वितीय), कुडचडे काकोडा शिगमोत्सव समिती (तृतीय) तर पाईकदेव शिगमोत्सव समिती, सांगे यांना चौथे व खांडेपार शिगमोत्सव समिती, खांडेपार यांना पाचवे बक्षीस प्राप्त झाले.

लोककला पथकांत सिद्धीविनायक महालसा कला संघ, आकार-म्हार्दोळ पथकाला प्रथम, सरस्वती कला मंडळ, केळबाय-कुर्टी द्वितीय तर नवदुर्गा कला आणि सांस्कृतिक मंडळ, मडकई यांना तृतीय तसेच पाईकदेव महामाया महिला मंडळ, झरीवाडा-कोटार्ली यांना चौथा पुरस्कार प्राप्त झाला.

वेशभूषा स्पर्धेत मदन तारी प्रथम, शौर्य नाईक द्वितीय तर निखिल पालयेकर याला तृतीय बक्षीस प्राप्त झाले. कनिष्ठ गटात आरोही वेरेकर, वेदांत नाईक, रूद्रज नाईक, ह्रत्वी नाईक, आर्या राऊत, शौर्या गावकर, आरवी तळावलीकर, श्रया फडते, तनुश्री वाडीकर व कृष्णा नाईक यांना अनुक्रमे पुरस्कार प्राप्त झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amthane Dam: भर पावसातही ‘आमठाणे’ कोरडे! धरणात 5 टक्केच पाणी; पर्यटनावरही परिणाम

UTAA: प्रकाश वेळीपना धक्‍का! ‘उटा’च्या विद्यमान समितीवर निर्बंध; सभा-आर्थिक व्‍यवहार करण्यास मनाई

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT