Goa Agriculture Dainik Gomantak
गोवा

Goa Agriculture: मडकई आमरेखाजन बांधाची अखेर दुरुस्ती!

मडकईतील आमरेखाजन शेतीच्या बांधाची दुरुस्ती अखेर माधवराव ढवळीकर ट्रस्टमार्फत शेतकऱ्यांच्या सहकार्याने करण्यात आली.

दैनिक गोमन्तक

Goa Agriculture: मडकईतील आमरेखाजन शेतीच्या बांधाची दुरुस्ती अखेर माधवराव ढवळीकर ट्रस्टमार्फत शेतकऱ्यांच्या सहकार्याने करण्यात आली. या बांधाचे बांधकाम सरकारकडून केले जाणार आहे. स्थानिक आमदार तथा राज्याचे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी याप्रकरणी पुढाकार घेतल्यामुळे बांध फुटल्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला आहे.

वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी शेतकऱ्यांसमवेत तसेच सरकारी अधिकारी व मडकईचे सरपंच व इतर पंचांसमवेत जाऊन पाहणी केली व आवश्‍यक सूचना केल्या.

आमरेखाजन शेतीचा बांध फुटल्यामुळे येथील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. शेतीत खारे पाणी शिरल्यामुळे शेती कसणे मुश्‍किलीचे ठरल्यामुळे गोंधळ उडाला होता.

हा बांध फुटल्यानंतर शेतकऱ्यांच्या समितीत निधीचा घोळ झाल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांनी बांध बांधण्याची जोरदार मागणी केली होती. प्रकरण मामलेदारांपर्यंत पोहोचले होते. त्यामुळे आता नवीन शेतकरी समितीमार्फत हे काम पुढे रेटण्याचे ठरले आहे.

या बांधाचा विषय घेऊन येथील शेतकरी आमदार तथा मंत्री सुदिन ढवळीकर यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी त्यात लक्ष घालून माधवराव ढवळीकर ट्रस्टमार्फत या बांधाची दुरुस्ती करण्याची ग्वाही दिली व त्यानुसार आवश्‍यक निधी उपलब्ध करून कामही करण्यात आले. शेतकऱ्यांनी या बांधाची दुरुस्ती केल्यामुळे आता शेतीसाठी सोयीस्कर ठरणार आहे.

शेतीलाच पहिले प्राधान्य..!

मडकई मतदारसंघात शेती कसण्यासाठी पहिले प्राधान्य देण्यात आले आहे. आपले राज्य कृषिप्रधान व्हावे असे प्रत्येकाला वाटते; पण त्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्‍यकता आहे.

माधवराव ढवळीकर ट्रस्टमार्फत शेतकऱ्यांना आवश्‍यक सहकार्य करताना मडकई मतदारसंघ सुजलाम्‌ सुफलाम्‌ व्हावा, हीच मनीषा बाळगली असल्याचे या भागाचे आमदार तथा मंत्री सुदिन ढवळीकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

सरकारमार्फत होणार काम

आज वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी ढवळीकर ट्रस्टचे विश्‍वस्त मिथिल ढवळीकर यांच्यासह सरपंच शैलेंद्र पणजीकर, शेतकरी, जलस्त्रोत खाते, कृषी खाते व सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांसमवेत या ठिकाणी पाहणी करून या बांधाचे काम सरकारी खात्यांतर्गत घेण्याची सूचना केली, त्यानुसार हे काम आता सरकारमार्फत करण्यात येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

SCROLL FOR NEXT