qupem farm theft case Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: फार्म हाउसमधील रोख, दुचाकी घेऊन काढला होता पळ, 6 महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक

qupem farm theft case: मळकर्णे-केपे येथील एका फार्मवर व्‍यवस्‍थापक म्‍हणून काम करणाऱ्या दीपंकर कश्‍‍यप या संशयिताने फार्म हाउसमधील रोख आणि दुचाकी घेऊन पळ काढला होता.

Sameer Amunekar

मडगाव: मळकर्णे-केपे येथील एका फार्मवर व्‍यवस्‍थापक म्‍हणून काम करणाऱ्या दीपंकर कश्‍‍यप या संशयिताने फार्म हाउसमधील रोख आणि दुचाकी घेऊन पळ काढला होता. मागचे सहा महिने फरार असलेल्‍या या संशयिताला दोन दिवसांपूर्वी केपे पोलिसांनी कांदोळी येथे अटक केली. संशयिताने ही चोरी केल्‍यानंतर झारखंडमध्‍ये पळ काढला होता.

या प्रकरणी फार्म हाउसचे मालक योगेश कुंकळ्येकर यांनी केपे पोलिसात तक्रार दिली होती. १० एप्रिल रोजी ही चोरीची घटना घडली होती. फार्म हाउसमध्ये असलेले पावणेदोन लाख रुपये रोख, एक मोबाईल आणि दुसऱ्या एका सहकाऱ्याची दुचाकी घेऊन त्‍याने पळ काढला होता.

हा संशयित त्‍यानंतर झारखंडला पळून गेला होता. झारखंडमध्‍ये जाऊन त्‍याचा शोध घेण्‍याचा प्रयत्‍न केला असता तो सापडला नव्‍हता.

या प्रकरणातील तपास अधिकारी असलेले केपेचे उपनिरीक्षक सोमेश प्रभुदेसाई हे त्‍याच्‍या मोबाइलच्या ट्रॅकींगवर होते. १२ सप्‍टेंबर रोजी संशयिताच्‍या मोबाईल ट्रॅकींगवर तो कांदोळी येथे असल्‍याची माहिती मिळाल्‍यावर उपनिरीक्षक प्रभुदेसाई, हवालदार प्रणय नाईक व पोलिस शिपाई अमीर नाईक हे तिघेही कांदोळीला रवाना झाले.

कांदोळी व कळंगूट भागातील सहा-सात रिसॉर्टमध्‍ये जाऊन संशयिताचा शोध घेण्‍याचा प्रयत्‍न केला असता, कांदोळीतील एका रिसॉर्टमध्‍ये तो रिसेप्‍शन काऊंटरवर बसलेला दिसला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: काणकोणमध्ये पर्यटकांच्या लॅपटॉपवर डल्ला

अग्रलेख: गोव्यात अलीकडच्या काळात 'विकास' थोपवला जात असल्याची भावना बळावत आहे; संवादाचा अभाव

Margao New Flyover: मडगाववासियांसाठी खुशखबर! उभा राहणार होणार नवा उड्डाणपूल; मंत्री कामतांची दिल्लीवारी यशस्वी

Marathi Language: "मराठीला मानाचे स्थान दिल्याशिवाय मराठीप्रेमी गप्प बसणार नाही"! फर्मागुढीतील मातृशक्ती मेळाव्यात इशारा

Goa Bike Theft: कागदपत्र आणतो म्हणून पळाले..ते गेलेच! केरळमधून चोरलेली बाईक पोलिसांनी केली जप्त; शिर्ली-धर्मापूरमधील घटना

SCROLL FOR NEXT